गुरुविना जीवन व्यर्थ-सूरिश्‍वर

By Admin | Updated: February 12, 2015 00:48 IST2015-02-12T00:48:00+5:302015-02-12T00:48:00+5:30

पुज्यपाद आचार्यदेव श्री मद विजय अजितशेखर सुरीश्‍वरजी महाराज यांचे प्रवचन.

Gurvina life vain - sunishwar | गुरुविना जीवन व्यर्थ-सूरिश्‍वर

गुरुविना जीवन व्यर्थ-सूरिश्‍वर

वाशिम : धूम स्टाईलने धावणार्‍या वाहनांसाठी ज्या प्रमाणे ब्रेक ची गरज अत्यावश्यक आहे. अगदी त्या प्रमाणेच मनुष्य जीवनात सुध्दा मानवाला मार्गदर्शनासाठी निस्पृह, वैरागी व ज्ञानी गुरुची आवश्यकता आहे. गुरु विना व्यक्तीचे जीवन व्यर्थ आहे, असे प्रतिपादन सुमधूर प्रवचनकार पुज्यपाद आचार्यदेव ङ्म्रीमद विजय अजितशेखर सुरीश्‍वरजी महाराज यांनी आज दि.११ आपल्या सुमधूर वाणीव्दारे प्रवचन देतांना केले. स्थानिक अग्रसेन भवन येथे आचार्य अजितशेखर सुधीरजी यांचे मानवता के तीन स्तंभ या विषयावर जाहीर प्रवचन होते. यावेळी परम पुज्य तपस्वीराज पंन्यास प्रवर विमलबोधी विजयजी महाराज, परमपुज्य प्रवचन प्रभावक दर्शनवल्लभ विजयजी महाराज यांच्या सह मुनीङ्म्री मंत्रशेखर विजयजी, मुनिङ्म्री कृपा वल्लभ विजयजी, मुनीङ्म्री रम्यबोधी विजयजी, मुनीङ्म्री जनधर्मशेखर विजयजी, मुनीङ्म्री मैत्रीशेखर विजयजी, बालमुनीङ्म्री नम्रवल्लभ विजयजी, मुनी भव्यशेखर विजयजी आदी साधू महाराजांची उपस्थिती होती. जिवदयाच्या कार्याची संधी मिळाल्यास मागे हटू नका असे आवाहन सुरीश्‍वरजी यांनी केले. याप्रसंगी मारवाडी युवा मंचचे जिल्हाध्यक्ष शैलेश सोमाणी, खंडेलवाल, दिगंबर जैन समाजाचे प्रकाशचंद बज, प्रविण पाटणी, अमित पाटणी, वाशिम अर्बन बॅकेचे सहायक सरव्यवस्थापक सखाराम ब्रम्हेकर, हरिराम राठोड, निलेश सोमाणी, अनिल वाल्ले, आदी सह मोठया संख्येने भाविक उपस्थित होते.

 

Web Title: Gurvina life vain - sunishwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.