शेलूबाजार येथे गुरु रविदास जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:49 IST2021-03-01T04:49:16+5:302021-03-01T04:49:16+5:30

सर्वप्रथम गुरु रविदास महाराज बाबू जगजीवनराम यांच्या प्रतिमेचे सामूहिकरीत्या पूजन करण्यात आले. याप्रसंगी युवा अध्यक्ष अजय परसे यांनी गुरू ...

Guru Ravidas Jayanti celebration at Shelubazar | शेलूबाजार येथे गुरु रविदास जयंती साजरी

शेलूबाजार येथे गुरु रविदास जयंती साजरी

सर्वप्रथम गुरु रविदास महाराज बाबू जगजीवनराम यांच्या प्रतिमेचे सामूहिकरीत्या पूजन करण्यात आले. याप्रसंगी युवा अध्यक्ष अजय परसे यांनी गुरू रविदास चरित्रावर प्रकाश टाकत असताना गुरु रविदास यांनी अनेक मानवतावादी कार्य करताना जनतेला मानवतेचा संदेश दिला. संत मीराबाई यांनी त्यांच्या या कार्याविषयी भावूक होऊन त्यांना गुरुस्थानी मानले तरी समाज बांधवांनी खेकडा प्रवृत्ती सोडून सामाजिक धार्मिक राष्ट्रीय कार्यात मतभेद सोडून एकत्रित व्हावे, असे विचार व्यक्त केले. याप्रसंगी प्रमुख उपस्थितीत माजी ग्राम पंचायत सदस्य गोपाल परसे, गणेश परसे, नारायण परसे, हनुमान बसेरे, विजय चंदेरे, विजय परसे, राहुल परसे, प्रकाश परसे, प्रविण खिरे, शंकर चरचरे, आदी समाज बांधव उपस्थित होते. सूत्रसंचालन मधुकरराव डोके यांनी, तर आभार अजय परसे यांनी केले तीर्थप्रसाद नंतर कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.

Web Title: Guru Ravidas Jayanti celebration at Shelubazar