‘समृद्ध गाव’अंतर्गत गावकऱ्यांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:26 IST2021-02-05T09:26:45+5:302021-02-05T09:26:45+5:30
------------ वाशिम तालुक्यात कोरोना चाचणीला गती वाशिम : जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत वाशिम तालुक्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण अधिक आहे. ...

‘समृद्ध गाव’अंतर्गत गावकऱ्यांना मार्गदर्शन
------------
वाशिम तालुक्यात कोरोना चाचणीला गती
वाशिम : जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत वाशिम तालुक्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण अधिक आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने तालुक्यात कोरोना चाचणीला गती दिली असून, आरोग्य विभागाकडून सोमवारी प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील ७ व्यक्तींसह ग्रामीण भागांतील ३ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले. त्यामुळे नागरिकांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
-----
विजेचा धक्का लागलेल्या माकडाला जीवदान
वाशिम : मंगरुळपीर तालुक्यातील शेलूबाजार येथे सोमवारी एका माकडाला विजेचा जोरदार धक्का लागल्याने तो सैरावैरा पळत होता. या घटनेची माहिती निसर्ग स्पर्श फाऊंडेशनच्या वनोजा शाखेतील सदस्यांना मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत माकडाला पकडून त्याच्यावर पशू दवाखान्यात उपचार केले. त्यानंतर हे माकड जंगलात सोडण्यात आले.
----------------------
मानोऱ्यात कापसाची विक्रमी आवक
वाशिम : शेतकऱ्यांच्या मागणीनुसार मानोरा येथे सीसीआयकडून गुरुवारी शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रावर कापूस विकण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू असून, सोमवारपर्यंतच्या चार दिवसांत या केंद्रावर दोन हजारांहून अधिक क्विंटल कापसाची आवक झाली. यात नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडील कापूस मोजून घेण्यात आला.
===Photopath===
250121\25wsm_4_25012021_35.jpg
===Caption===
‘समृद्ध गाव’अंतर्गत गावकऱ्यांना मार्गदर्शन