भाजीपाल्यावरील किड व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:17 IST2021-03-04T05:17:49+5:302021-03-04T05:17:49+5:30

भेंडी पिकावरील शेंडे व फळे पोखरणाºया अळीसाठी उच्च आर्द्रता व जास्त उष्णतामान पोषक असल्याने सद्यस्थितीत या अळीचा अधिक प्रादुर्भाव ...

Guidance on Pest Management on Vegetables | भाजीपाल्यावरील किड व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन

भाजीपाल्यावरील किड व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन

भेंडी पिकावरील शेंडे व फळे पोखरणाºया अळीसाठी उच्च आर्द्रता व जास्त उष्णतामान पोषक असल्याने सद्यस्थितीत या अळीचा अधिक प्रादुर्भाव आढळून येत आहे. या किडीला विशेष पोषक ठरते. या किडीची अळी सुरुवातीला झाडाची कोवळी शेंडे पोखरते. त्यामुळे भेंडीच्या झाडाला कळ्या फुले व फळे येण्यास सुरुवात झाल्यावर या किडीची अळी नंतर कळ्या फुले व फळे पोखरते व आत राहून त्यातील पेशी खाते. त्यामुळे फुले व फळाचे नुकसान होते. प्रादुर्भावग्रस्त भेंड्या विकृत आकाराच्या होतात. असा माल विकल्या जात नाही. परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्याशिवाय भेंडी पिकावरील मावा ही किड पाने व कोवळ्या भागातून रस शोषण करते. यामुळे बुरशीची वाढ होते आणि भेंडी पिकात प्रकाश संश्लेषण क्रिया बाधित होऊन झाडाची वाढ खुंटते व परिणामी उत्पादनात घट येऊ शकते. भेंडीवरील विविध किडीच्या सुप्तावस्थेत नाश करण्याकरिता उन्हाळ्यात खोल नांगरणी करणे, पीक एकसारखे न घेता पिकांचे फेरपालट करणे, किड नियंत्रणाकरिता एकरी दोन ते तीन कामगंध सापळे भेंडी पिकात लावणे, पांढरी माशीच्या व्यवस्थापनासाठी प्रति एकरी आठ ते दहा पिवळे चिकट सापळे लावणे, प्रती एकर पाच ते सहा पक्ष्यांना बसण्यासाठी पक्षी थांबे लावणे, अनावश्‍यक रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळणे, अशी माहिती राजेश डवरे यांनी दिली.

Web Title: Guidance on Pest Management on Vegetables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.