संत्र्यावरील कीड नियंत्रणाबाबत मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:41 IST2021-07-31T04:41:31+5:302021-07-31T04:41:31+5:30

--------------- महावितरणच्या जीवनप्रकाश योजनेला प्रतिसाद वाशिम : राज्य शासनाच्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजने’मधून अनुसूचित जाती व ...

Guidance on pest control on oranges | संत्र्यावरील कीड नियंत्रणाबाबत मार्गदर्शन

संत्र्यावरील कीड नियंत्रणाबाबत मार्गदर्शन

---------------

महावितरणच्या जीवनप्रकाश योजनेला प्रतिसाद

वाशिम : राज्य शासनाच्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजने’मधून अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील अर्जदारांना महावितरणकडून नवीन घरगुती वीजजोडणी प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात येत आहे. या योजनेला जिल्ह्यात प्रतिसाद लाभत आहे.

--------

खरडलेल्या शेतीसाठी मदतीची मागणी

वाशिम : गत महिन्यात अतिवृष्टीमुळे उमरा शमशोद्दीन येथील जमिनी खरडून गेल्या, तर एका शेतकऱ्याची विहीरही खचली. या नुकसानीस महिना उलटला तरी शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी यासंदर्भात तहसीलदार वाशिम यांच्याकडे निवेदनही दिले आहे.

-------------

स्वच्छतेबाबत ग्रामस्थांत जनजागृती

वाशिम : मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथे ग्रामपंचायतकडून कोरोना विषाणूचा संसर्ग थांबविण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत असून, याअंतर्गत ग्रामपंचायतच्या वतीने स्वच्छतेबाबत शुक्रवारी जनजागृती करण्यात आली.

---------------

कामरगाव येथील बाजार राहणार बंद

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कामरगाव येथे भरणारा आठवडी बाजार या आठवड्यातही भरणार नाही. ३० जुलै रोजी ग्रामपंचायतने त्याबाबत गावात माहितीही दिली असून, सूचनेचे पालन करण्याचे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे.

----------

कोरोनाबाबत जनजागृती

वाशिम : कोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून दक्षता घेतली जात आहे. याअंतर्गत ९ जुलै रोजी आसेगाव परिसरात जनजागृती करण्यात आली.

----------------

पोलिसांकडून वाहनांची तपासणी

वाशिम : जिल्ह्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनांची तपासणी पोलिसांकडून केली जात आहे. याअंतर्गत वाशिम-पुसद मार्गावर २१ वाहनचालकांवर पोलिसांनी गुरुवारी कारवाई केली. गेल्या चार दिवसांत अनेक वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.

-----------

Web Title: Guidance on pest control on oranges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.