पावसाळ्यातील जनावरांचे व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:42 IST2021-05-12T04:42:14+5:302021-05-12T04:42:14+5:30
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कोरोना संसर्गाच्या काळात शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी, याबाबतचा संदेश देण्यात आला. ऑनलाईन कार्यक्रमाचे उद्घाटन कृषी विज्ञान केंद्र, ...

पावसाळ्यातील जनावरांचे व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कोरोना संसर्गाच्या काळात शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी, याबाबतचा संदेश देण्यात आला. ऑनलाईन कार्यक्रमाचे उद्घाटन कृषी विज्ञान केंद्र, वाशिमचे प्रमुख डॉ. रवींद्र काळे यांनी केले. एकात्मिक शेती पद्धतीचे मॉडेल हे मानवी आरोग्यासोबतच जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी कसे फायद्याचे आहे, ग्रामीण युवकांनी त्याचा जास्तीत जास्त अंगीकार करून स्वयंरोजगार निर्माण करावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच शेती व पशु एकाच नाण्याच्या दोन बाजू असून, शेतीमध्ये कमी होत असलेले सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढवायचे असतील तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पशुपालनाकडे लक्ष केंद्रित करणे कसे गरजेचे आहे हे पटवून दिले.
तांत्रिक प्रशिक्षणामध्ये पशु विज्ञान विभागाचे डॉ. डी. एल. रामटेके यांनी पावसाळ्यातील जनावरांचे व्यवस्थापन याविषयी सखोल मार्गदर्शन करून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात जनावरांना योग्य वेळी लसीकरण करून जनावरांचे पावसाळ्यात होणाऱ्या आजारांपासून संरक्षण करावे तसेच जनावरांच्या आहारातील घटक याविषयीसुद्धा सखोल मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी मुरघास, हायड्रोपोनिक्स व अझोला या तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संगणकतज्ज्ञ बावस्कर यांनी मानले.