कार्यशाळेतून खत विक्रेत्यांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:28 IST2021-02-05T09:28:42+5:302021-02-05T09:28:42+5:30
कार्यशाळेला जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विकास बंडगर, मोहीम अधिकारी चंद्रकांत भागडे, वाशिम पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी प्रमोद ...

कार्यशाळेतून खत विक्रेत्यांना मार्गदर्शन
कार्यशाळेला जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विकास बंडगर, मोहीम अधिकारी चंद्रकांत भागडे, वाशिम पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी प्रमोद बदरखे, कृषी सेवा केंद्र संचालक संघटनेचे सुनील पाटील, आरसीएफचे जिल्हा व्यवस्थापक वाईनदेशकर यांच्यासह कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी, सर्व खत विक्रेते व कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रत्यक्ष साठा आणि इ-पॉस खत साठा हा समान असण्याची खात्री करणे, ऑफलाइन खत विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाईचा प्रस्ताव परवाना अधिकाऱ्यांकडे सादर करणे, सर्व खत विक्रेत्यांकडे इ-पॉस मशीन ३.१ व्हर्जन अपडेट करणे, जास्तीतजास्त खत विक्रेत्यांकडे डेस्क टॉप व मोबाइल व्हर्जन सुरू करून देणे आणि प्रशिक्षण देणे, ऑनलाइन पद्धतीने खत विक्री करताना येणाऱ्या अडी-अडचणी सोडविणे आदी विषयांवर या कार्यशाळेत चर्चा झाली. खत विक्रेत्यांनी शासन नियमानुसार विक्री करावी, इ-पॉस मशीनवरील साठ्याप्रमाणे खत वितरण करावे, काही शंका, अडचणी असल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विकास अधिकारी बंडगर यांनी केले. सूत्रसंचालन जिल्हा कृषी अधिकारी रमेश भद्रोड यांनी तर विस्तार अधिकारी आशिष मुळे यांनी आभार प्रदर्शन केले.