कृषी संजीवनी मोहिमेंतर्गत उंबर्डा बाजार येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:27 IST2021-06-29T04:27:26+5:302021-06-29T04:27:26+5:30

कृषी संजीवनी मोहीम सप्ताहांतर्गत ग्राम उंबर्डा बाजार येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. उंबर्डा बाजार येथील ग्रामपंचायत ...

Guidance to farmers at Umbarda Bazaar under Krishi Sanjeevani Mohima | कृषी संजीवनी मोहिमेंतर्गत उंबर्डा बाजार येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

कृषी संजीवनी मोहिमेंतर्गत उंबर्डा बाजार येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

कृषी संजीवनी मोहीम सप्ताहांतर्गत ग्राम उंबर्डा बाजार येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

उंबर्डा बाजार येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात बीबीएफ तंत्रज्ञानाचे फायदे शेतकऱ्यांना पटवून देण्यात आले.

या कार्यक्रमात कृषी सहायक संतोष मिसाळ, कृषी पर्यवेक्षक सचिन उदयकार तथा शेती शाळा प्रशिक्षक मंगेश सुरजुसे आदींनी शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला सरपंच राज चौधरी, उपसरपंच रघुनाथ भगत, बबन हळदे, शरद पचगाडे, गणेश ठाकरे, डोईफोडे यांच्यासह अन्य शेतकरी बांधवांची उपस्थिती होती. शेतकरी बांधवांना इफको कंपनीकडून मोफत माती नमुना तपासणी करून मिळणार असल्याने शेतकरी बांधवांनी लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा आभारप्रदर्शन कृषिमित्र अंकुश रनमाळे यांनी केले.

Web Title: Guidance to farmers at Umbarda Bazaar under Krishi Sanjeevani Mohima