गुढीपाडव्याला शेतात तास काढण्याची पद्धत मोडकळीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:38 IST2021-04-14T04:38:00+5:302021-04-14T04:38:00+5:30
गुढीपाडव्यानिमित्त तसेच शेतकऱ्यांच्या नववर्षानिमित्त पूर्वीपासून गुढीपाडव्याच्या दिवशी शेतात तास काढण्याची पद्धत होती. याला शेतकऱ्याचा मुहूर्त असेही समजले जात होते. ...

गुढीपाडव्याला शेतात तास काढण्याची पद्धत मोडकळीस
गुढीपाडव्यानिमित्त तसेच शेतकऱ्यांच्या नववर्षानिमित्त पूर्वीपासून गुढीपाडव्याच्या दिवशी शेतात तास काढण्याची पद्धत होती. याला शेतकऱ्याचा मुहूर्त असेही समजले जात होते. परंतु जसजशी यांत्रिकी शेती येत गेली तसे शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील काम करण्यासाठी असलेल्या बैलजोड्या विकल्या. त्यामुळे आता शेतकऱ्यांजवळ गुढीपाडव्याच्या सणाला शेतात तास काढण्यासाठी बैलसुद्धा राहिले नाहीत. पूर्वी शेतकरी याच दिवशी शेती बटईने देणे, शेती भागाने देणे आदी व्यवहार केल्या जात होते. पूर्वी प्रत्येक शेतकऱ्याच्या दारात बैलजोडी असायची. परंतु आता यांत्रिकी शेतीमुळे मोठ्या शेतकऱ्यांकडे बैलजोड्या शिल्लक राहिल्या नाहीत. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शेतीसाठी दरवर्षी सालगडीसुद्धा याच दिवशी ठरविल्या जाऊन शेतकरी आपल्या शेताच्या कामाची सुरुवात करीत होते. परंतु या सर्व पद्धती आता बंद झाल्याचे दिसून येते.