शिक्षकांच्या मागणीसाठी पालक धडकले जिल्हा परिषदेवर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 20:21 IST2017-09-12T20:21:28+5:302017-09-12T20:21:28+5:30
कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील जिल्हा परिषद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासंदर्भात मंगळवार, १२ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद सदस्यांसह पालकांनी जिल्हा परिषदेवर धडक दिली. लवकरच शिक्षक दिले जातील, असे आश्वासन जिल्हा परिषद अध्यक्षांसह शिक्षणाधिकाºयांनी दिले.

शिक्षकांच्या मागणीसाठी पालक धडकले जिल्हा परिषदेवर !
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम - कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील जिल्हा परिषद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासंदर्भात मंगळवार, १२ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद सदस्यांसह पालकांनी जिल्हा परिषदेवर धडक दिली. लवकरच शिक्षक दिले जातील, असे आश्वासन जिल्हा परिषद अध्यक्षांसह शिक्षणाधिकाºयांनी दिले.
खासगी शाळांच्या तुलनेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमधील शिक्षण दर्जेदार नसते, अशी ओरड नेहमीच होत असते. या पृष्ठभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्येही भौतिक सुविधा उपलब्ध करण्याला शासनातर्फे प्राधान्य दिले जात आहे. दुसरीकडे या शाळांवर शिक्षकांची काही पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. वाशिम जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी तासिका तत्वावर शिक्षकांची नियुक्ती करण्याला जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने मंजुरात दिली होती. त्यानुसार वाशिम, कामरगाव व विठोली येथील कनिष्ठ महाविद्यालयात इंग्रजी, गणित, भौतिकशास्त्र, रसायन शास्त्र, जीवशास्त्र यासह महत्त्वाच्या विषयाच्या शिक्षकांची रिक्त पदे तासिका तत्वावर भरण्यात आली. मात्र, कामरगाव येथील शाळेवर शिक्षक रूजू झाले नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याप्रकरणी जिल्हा परिषद सदस्य मिना भोने यांनी जिल्हा परिषदेकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र, शिक्षक मिळाले नसल्याने मंगळवारी पालकांसह भोने यांनी जिल्हा परिषद कार्यालय गाठले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांच्या दालनात रिक्त पदांसंदर्भात शिक्षणाधिकाºयांसोबत चर्चा करण्यात आली. शिक्षक रूजू होत नसतील तर प्रतिक्षा यादीतील शिक्षकांना तेथे लवकरच नियुक्ती द्यावी, अशा सूचना हर्षदा देशमुख यांनी केल्या. आवश्यक ते प्रशासकीय सोपस्कार पार पाडल्यानंतर कामरगाव येथे प्रतिक्षा यादीतील शिक्षक दिले जातील, अशी ग्वाही शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांनी दिली.