पालकमंत्र्यांनी घेतला आरोग्यविषयक आाढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:43 IST2021-05-18T04:43:09+5:302021-05-18T04:43:09+5:30
जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, निवासी ...

पालकमंत्र्यांनी घेतला आरोग्यविषयक आाढावा
जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री देसाई म्हणाले, कोरोना विषाणू संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडची संख्या वाढविण्याचे नियोजन करावे. आवश्यकता भासल्यास तालुकास्तरावरसुद्धा ऑक्सिजन बेडची सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने पूर्वतयारी करावी. तसेच तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने शासकीय रुग्णालयामध्ये कोरोनाबाधित लहान मुलांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करावा. या ठिकाणी पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध होण्याच्या दृष्टीने नियोजन करावे तसेच ऑक्सिजन साठवणुकीसाठी आणखी सुविधा निर्माण करण्यासाठी नियोजन करावे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविरुद्ध लढण्यासाठी आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे पालकमंत्री यावेळी म्हणाले. जिल्ह्यातील रेमडेसिविर इंजेक्शन व ऑक्सिजनचा पुरवठा, नवीन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांची उभारणी, वादळ व अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान याचाही पालकमंत्र्यांनी यावेळी आढावा घेतला.
००००
आणखी १५० बेडचे नियोजन
जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थिती व प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती दिली. ते म्हणाले, जिल्ह्यातील आरोग्य सुविधा सक्षम करण्यासाठी नियोजन सुरू असून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा स्त्री रुग्णालय येथे आणखी १०० बेड व कारंजा उपजिल्हा रुग्णालयात आणखी ५० बेड वाढविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात कोरोनाबाधित लहान मुलांवर उपचारांसाठी ५० बेडचा स्वतंत्र कक्ष सुरू करणे, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प व ऑक्सिजन टँक उभारण्याचे नियोजन आहे, असे त्यांनी सांगितले.