पालकमंत्री उद्या जिल्हा दौऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:20 IST2021-01-24T04:20:00+5:302021-01-24T04:20:00+5:30

२५ जानेवारी रोजी दुपारी ३.३० वाजता नागपूर येथून शासकीय वाहनाने वाशिमकडे प्रयाण करतील. रात्री ८.३० वाजता वाशिम शासकीय विश्रामगृह ...

Guardian Minister on district tour tomorrow | पालकमंत्री उद्या जिल्हा दौऱ्यावर

पालकमंत्री उद्या जिल्हा दौऱ्यावर

२५ जानेवारी रोजी दुपारी ३.३० वाजता नागपूर येथून शासकीय वाहनाने वाशिमकडे प्रयाण करतील. रात्री ८.३० वाजता वाशिम शासकीय विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम असून २६ जानेवारी रोजी सकाळी ९.१५ वाजता प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस कवायत मैदान येथे आयोजत मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित राहतील. सकाळी १०.१० वाजता वाशिम येथील राजस्थान आर्य कॉलेजमध्ये आयोजित रक्तदान शिबिराला उपस्थित राहतील. सकाळी १०.३० वाजता पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे जिल्हा नियोजन समितीच्या कार्यकारी समितीची सभा आणि सकाळी ११ वाजता जिल्हा नियोजन समितीची सभा होणार आहे. दुपारी १२.१५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात विविध जिल्हास्तरीय समित्यांच्या सभेला उपस्थिती, सायंकाळी ४ वाजता त्यांचे रिसोड येथे आगमन व आमदार अमित झनक यांनी आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थिती राहणार आहे. सायंकाळी ५ वाजता रिसोड येथून शासकीय वाहनाने ते औरंगाबादकडे प्रयाण करतील.

Web Title: Guardian Minister on district tour tomorrow