शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

बियाणे भेसळीच्या प्रकरणांत वाढ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 20:17 IST

तालुक्यात महाबीजच्या बियाण्यांतील भेसळीच्या प्रकरणांचा आकडा अधिक वाढला आहे. विशेष म्हणजे महाबीजच्या ज्या लॉटमधील बियाण्यांत भेसळ झाल्याची तक्रार करण्यात आली होती. त्या लॉटमधील बियाणे पेरणाºया शेतकºयाच्या शेतात कृषी विभाग आणि महाबीजच्या प्रतिनिधीने भेट दिली असता. दोन शेतकºयांच्या शेतात भेसळ असल्याचे दिसून आले. त्यामुळे या संदर्भातील शेतकºयांनी केलेल्या तक्रारीत तथ्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

ठळक मुद्देमंंगरुळपीर तालुक्यातील चित्रशेतक-यांच्या तक्रारी मात्र बेदखल

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: तालुक्यात महाबीजच्या बियाण्यांतील भेसळीच्या प्रकरणांचा आकडा अधिक वाढला आहे. विशेष म्हणजे महाबीजच्या ज्या लॉटमधील बियाण्यांत भेसळ झाल्याची तक्रार करण्यात आली होती. त्या लॉटमधील बियाणे पेरणाºया शेतकºयाच्या शेतात कृषी विभाग आणि महाबीजच्या प्रतिनिधीने भेट दिली असता. दोन शेतकºयांच्या शेतात भेसळ असल्याचे दिसून आले. त्यामुळे या संदर्भातील शेतकºयांनी केलेल्या तक्रारीत तथ्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. मंगरुळपीर तालुक्यातील चांभई येथील शेतकरी गोविंदा भगत यांनी यंदाच्या खरीप हंगामात खरेदी विक्री समितीमधून पेरणीसाठी महाबीजचे ९३०५ वाणाचे तीन बॅग सोयाबीन विकत घेतले होते. सदर बियाणे उगविल्यानंतर त्यामध्ये दुसºया वाणाची झाडे मोठ्या प्रमाणात उगविल्याचे त्यांना दिसले. या संदर्भात त्यांनी मंगरुळपीर पंचायत समितीच्या कृषी अधिकाºयांकडे तक्रार केल्यानंतर काही दिवसांनी कृषी शास्त्रज्ञ, तालुका कृषी अधिकारी, तसेच पंचायत समितीच्या कृषी अधिकाºयांनी त्यांच्या शेताची प्रत्यक्ष पाहणी केली असता. गोविंदा भगत यांच्या शेतात ९३०५ हे वाण ३० टक्के, तर इतर मिश्र वाण ७० टक्के असल्याचे दिसले. हाच प्रकार वाडा फार्म शिवारातील चार शेतकºयांसोबत घडला. त्यांच्या शेतात भेसळीचे प्रमाण कमी असल्याचे कृषी विभागाच्या पाहणी करणाºया अधिकाºयांना दिसले. त्यावरून गोविंदा भगत यांच्यासह पाचही शेतकºयांबाबत घडलेल्या प्रकाराचा एक संयुक्त अहवाल पंचायत समितीच्या कृषी अधिकाºयांनी तयार करून वरिष्ठ अधिकाºयांकडे पाठविला.  उपरोक्त शेतकरी गोविंदा भगत यांनी खरेदी विक्री समितीकडून ज्या लॉटमधील बियाणे खरेदी केले, त्याच लॉटमधील बियाणेमंगरुळपीर तालुक्यात सायखेडा येथील शेतकºयांनीही खरेदी केले होते. त्यामुळे कृषी विभागाच्या अधिकाºयांनी सायखेडा येथील संंबंधित शेतकरी पुरुषोत्तम काळे आणि गजानन भगत यांच्या शेतांची पाहणी करण्याचे ठरविले.  कृषी विभागाने सायखेडा येथील ज्या शेतकºयांच्या शेतामधील सोयाबीनची पाहणी केली. त्यामधील पुरुषोत्तम काळे यांच्या शेतात २८ टक्के, तर गजानन काळे यांच्या शेतात १५ टक्के भेसळ असल्याचेही स्पष्ट झाले.