शहरं
Join us  
Trending Stories
1
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
2
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
3
"पाच टप्प्यांतच भाजपा तीनशेपार, तर काँग्रेस…’’,  अमित शाहांचा मोठा दावा 
4
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
5
"माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नको..." प्रज्वल रेवन्नाला आजोबा देवेगौडांचा इशारा
6
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
7
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल
8
Narendra Modi : "काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी..."
9
"नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे पुणे अपघातावर गप्प का आहेत?" नितेश राणेंचा सवाल
10
"4 जून रोजी भरपूर पाणी जवळ ठेवा...", प्रशांत किशोर यांचा टीकाकारांवर निशाणा
11
PHOTOS : लोकसभा निवडणुकीत कलाकारांची एन्ट्री; म्हणाले, 'अब की पार 400 पार' निश्चित
12
IPL क्वालिफायर २ अन् फायनल लढतीत पावसाचा बाधा; सामना रद्द झाल्यास कोण जिंकणार ट्रॉफी?
13
T20 WC मध्ये टीम इंडियाला घाबरू नका, त्यांना १० वर्षात...; इंग्लंडच्या माजी खेळाडूने उगाच डिवचले
14
"कुणी कितीही बोललं तरी बटण..."; भाजपने मतदारांना पैसे वाटल्याचा शरद पवार गटाचा आरोप
15
जानकरांकडून महायुतीला ४२ जागांचा अंदाज, पण आठवलेंचा रिव्हर्स गियर; म्हणाले...
16
डोंबिवली एमआयडीसीत भीषण स्फोट; केमिकल कंपनीत बॉयलर फुटल्याने लागली आग
17
Swami Samartha: रोजच्या पूजेत 'या' गोष्टींचा समावेश केला तर स्वामी समर्थांची निश्चितच होईल कृपा!
18
Adani चं मोठं यश, पहिल्यांदाच सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री घेणार समूहाची 'ही' कंपनी?
19
Rituals: महिलांचा मासिक धर्म सुरु असताना जोडप्याने एकत्र राहू नये असे शास्त्र सांगते; पण का? वाचा!
20
थरारक! ५ मिनिटांत ६००० फूट विमान खाली आलं; साक्षात मृत्यू डोळ्यासमोर उभा राहिला

आजी-माजी सैनिकांच्या पाल्यांना मोफत शिक्षणासाठी संस्थांचा वाढता पुढाकार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2019 3:48 PM

मानोरा (वाशिम) : सैनिकांच्या पाल्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवून चांगला नागरिक घडविण्यासाठी जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांचा पुढाकार वाढतच आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा (वाशिम) : सैनिकांच्या पाल्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवून चांगला नागरिक घडविण्यासाठी जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांचा पुढाकार वाढतच आहे. मंगरुळपीर आणि रिसोडमधील काही शैक्षणिक संस्थांनी सैनिकांच्या पाल्यांना मोफत शिक्षण देण्याचे ठरविले असतानाच आता मानोरा येथील जे. एस. पब्लिक स्कूलनेही आजी-माजी सैनिकांच्या पाल्यांना मोफत शिक्षण देण्याचे ठरविले आहे. संस्थाध्यक्ष अरूण राठोड यांनी हा निर्णय घेतला आहे. देशाच्या सीमेवर देशवासियांच्या रक्षणासाठी डोळ्यात तेल घालून पहारा देणाºया आणि प्रसंगी प्राणाचे बलिदान देणारे शूर सैनिक कित्येक महिने, वर्ष  कुटूंबापासून दूरच राहतात. कधीकधी सीमेवर देशाचे रक्षण करतानाच त्यांना वीरगती प्राप्त होते. दुसरीकडे त्यांच्या हयातीत आणि पश्चातही त्यांच्या कुटुंबाला एकाकी जीवन जगावे लागते. अशा वीर जवानांचा यथोचीत सन्मान व्हावा, त्यांच्या पाल्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून वाशिम जिल्ह्यातील काही शैक्षणिक संस्था पुढे आल्या आहेत. आजी-माजी सैनिकांच्या पाल्यांना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. रिसोड तालुक्यातील वाकद व मोप येथील बाल शिवाजी इंग्लिश स्कूल, मंगरुळपीर येथील अभ्यासा प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांनी काही दिवसांपूर्वी हा निर्णय घेतल्यानंतर आता मानोरा येथील जे. एस. पब्लिक स्कूलचे अध्यक्ष अरूण राठोड आणि सचिव प्रा. अनिल चव्हाण यांनीही आजी-माजी सैनिकांच्या पाल्यांना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी शैक्षणिक सत्रापासून या निर्णयाची अमलबजावणी होणार असून, याची माहिती सर्वांना मिळावी यासाठी व्हॉटसअ‍ॅप, फेसबुकवर प्रसार करण्यासह सार्वजनिक ठिकाणी फलक लावण्यात येणार असल्याचे अरूण राठोड यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमEducationशिक्षण