शिवरायांना अभिवादन
By Admin | Updated: February 19, 2016 02:23 IST2016-02-19T02:02:35+5:302016-02-19T02:23:08+5:30
कारंजात मिरवणुकीवर सीसीटीव्ही कॅमे-यांचा वॉच राहणार.

शिवरायांना अभिवादन
वाशिम : कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयं तीनिनिमित्त वाशिम येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव समि तीच्यावतीने १९ फेब्रुवारी रोजी वारकरी दिंडी व शोभायात्रा निघणार आहे, अशी माहिती उत्सव समितीचे अध्यक्ष हभप श्रीकृष्ण पाटील महाराज यांनी दिली. स्थानिक विठ्ठलवाडी येथे दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्या हस्ते झेंडी दाखवून रॅलीस प्रारंभ होईल. ही रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास हारार्पण करून पाटणी चौक मार्गे शिवाजी चौकात जाईल. तेथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पु तळ्यास अभिवादन करून समारोपीय कार्यक्रम होईल. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष सोनाली जोगदंड, नगर परिषद अध्यक्ष लता ताई उलेमाले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी जयकुमार चक्रे, तहसीलदार आशिष बिजवल, सभापती नारायणराव गोटे, मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष अशोक महाले, सुभाष बोरकर, पीरिपाचे प्रदेशाध्यक्ष गोपाळराव आटोटे, माजी आमदार भीमराव कांबळे, सभापती वीरेंद्र देशमुख आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.