संत नरहरी सोनार यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:18 IST2021-03-04T05:18:07+5:302021-03-04T05:18:07+5:30

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानेश्वर वाढणकर होते. मधुकर खुणे, अतुल भांडेकर, महेश अंजनकर, किशोर वर्मा, गणेश अर्धापुरकर, विनोद बनाईतकर, अमोल कल्याणकर ...

Greetings to Saint Narhari Sonar | संत नरहरी सोनार यांना अभिवादन

संत नरहरी सोनार यांना अभिवादन

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानेश्वर वाढणकर होते. मधुकर खुणे, अतुल भांडेकर, महेश अंजनकर, किशोर वर्मा, गणेश अर्धापुरकर, विनोद बनाईतकर, अमोल कल्याणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संत नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामूहिक आरती करण्यात आली. प्रास्ताविक संदीप गौरकर यांनी केले. समाजातील विविध सामाजिक कार्यक्रम व सुखदु:खात समाजबांधवांनी एकमेकांना सहकार्य करावे, असा सूर मान्यवरांनी आळविला. कार्यक्रमाचे संचालन रामा इवरकर यांनी केले. जीवन भांडेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास मालेगाव शहरासह जउळका, शिरपूर, मुंगळा येथील सोनार समाजबांधव उपस्थित होते. याप्रसंगी कोरोनाविषयक नियमांचे पालन करून सर्वांना प्रसाद वाटप करण्यात आला.

जऊळका येथेही झाला कार्यक्रम

जऊळका रेल्वे : येथे कोरोनाविषयक नियमांचे पालन करून सोनार समाजबांधवांचे आराध्यदैवत संत नरहरी सोनार यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम पार पडला. प्रथम संत नरहरी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी समयोचित भाषणे दिली.

Web Title: Greetings to Saint Narhari Sonar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.