‘निर्भया लागली लढायला’ पथनाट्याला भव्य प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:46 IST2021-01-13T05:46:07+5:302021-01-13T05:46:07+5:30
कार्यक्रमाला अतिथी म्हणून नगर परिषदच्या टाऊन प्लॅनिंग अधिकारी रश्मी हलगे,नगरसेविका हेमलता इंगळे, पतंजली महिला जिल्हा प्रभारी दीपा वानखेडे, ...

‘निर्भया लागली लढायला’ पथनाट्याला भव्य प्रतिसाद
कार्यक्रमाला अतिथी म्हणून नगर परिषदच्या टाऊन प्लॅनिंग अधिकारी रश्मी हलगे,नगरसेविका हेमलता इंगळे, पतंजली महिला जिल्हा प्रभारी दीपा वानखेडे, लीलाताई खंडेलवाल उपस्थित होते. कार्यक्रमाचा प्रारंभ कन्या पुजनाने करण्यात आला. त्यानंतर पूर्वा नीलेश सोमाणी या चिमुकल्या बालिकेने पर्यावरण जनजागृती अंतर्गत पर्यावरणाचे महत्त्व पटवून दिले. यानंतर निर्भया लागली लढायला पथनाट्याने हुंडाबळी, मुलींची सार्वजनिक ठिकाणी होणारी छेडछाड, व्यसन याबाबत आपल्या कलाकृतीव्दारे कलावंतांनी बहारदार प्रस्तुती सादर करून जनजागृती केली. या पथनाट्यात लेखक व दिग्दर्शक राहुल अवचार, गायक शंकर सोळंके, कलावंत शारदा रामावत, निलोफर शेख, गजानन डहाळे,गणेश जाधव,अनिल हटकर, संगीता ढोले,विठ्ठल सुर्वे, ढोलकीवादक वासुदेव कांबळे, पॅडवादक प्रेमचंद कांबळे आदिंनी भूमिका साकारली. कार्यक्रमाच्या सुरवातीला बद्रीनारायण सोमाणी यांनी बेटी बचाव बाबत ये चिरय्या नन्हीसी चिडीया हे गीत सादर केले. या कार्यक्रमाला बेटी बचाव,बेटी पढावच्या प्रदेशाध्यक्ष संगीता इंगोले,लॉयनेस क्लबच्या अध्यक्षा ज्योती चरखा,सहेली उद्योजक मंडळाच्या अध्यक्षा अमरजितकौर कपूर, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा साधना नेनवाणी समवेत सर्व महिला मंडळाच्या पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगीता इंगोले यांनी संचालन लॉयनेस क्लबच्या सचिव हेमा सोमाणी यांनी तर आभार प्रदर्शन सोनाली गर्जे यांनी मानले.कार्यक्रमाला मोठया संख्येने महिलांची उपस्थिती होती.