स्मशानभूमी ‘मृत्युशय्ये’वर
By Admin | Updated: December 8, 2014 01:43 IST2014-12-08T01:36:37+5:302014-12-08T01:43:18+5:30
मूलभूत सुविधांचा अभाव : अत्यंसंस्कारासाठी येणा-यांना सोसावे लागतात हाल.

स्मशानभूमी ‘मृत्युशय्ये’वर
रिसोड : आयुष्यभर अनंत यातना सोसाणार्या माणसाला मृत्यूनंतर आपल्या कुशीत सामावून घेणारी येथील स्मशानभूमीच आजमितीला मृत्युशय्येवर पडली आहे. येथे मूलभूत सुविधांचा अभाव आहे. पुरेसे पाणी नाही, वीज नाही, बसण्याची व्यवस्था नाही; परिणामी अं त्यसंस्कारासाठी येणार्यांना येथे कमालीचे हाल सोसावे लागतात. धक्कादायक बाब म्हणजे, याकडे नगरपालिका प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष दिसून येत आहे.
रिसोड शहराचा विस्तार दिवसागणिक वाढत चालला आहे. नोकरी, शिक्षण व व्यवसायानिमित्त ग्रामीण भागातून अनेक कुटुंब येथे स्थायिक झाले आहेत. शहर विस्तारले असले तरी येथे हिंदू स्मशानभूमी मात्र एकच आहे. शहराबाहेरील मालेगाव नाक्याजवळ तीन एकर परिसरात ही स्मशानभूमी आहे. त्यातही सदर स्मशानभूमीत मूलभूत सुविधांचा अभाव दिसून येतो. येथे िपण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था केलेली नाही. सेठ भगवानदास अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्टकडून ह्यगंगा माँ निवाराह्ण म्हणून अंत्यसंस्कारासाठी येणार्या नागरिकांची बसण्याची व्यवस्था केली असली तरी सध्या ही व्यवस्था अपुरी पडत आहे. येथे चिताग्नीसाठी केलेली बीड धातूची जाळी अशरक्ष: चाळणी झाल्याने सरण रचताना नातेवाइकांना त्रास सहन करावा लागतो.