स्मशानभूमीच्या परिसराला विविध समस्यांचा विळखा

By Admin | Updated: August 10, 2014 23:01 IST2014-08-10T22:39:44+5:302014-08-10T23:01:08+5:30

सोयीसुविधांचा अभाव : कुंपणासह सौंदर्यीकरण आवश्यक

The graveyard area is known for various problems | स्मशानभूमीच्या परिसराला विविध समस्यांचा विळखा

स्मशानभूमीच्या परिसराला विविध समस्यांचा विळखा

मंगरुळपीर: शहरातील गवळीपुरा भागाला लागून कृषी उत्पन्न बाजार समितीच्याजवळ असलेल्या हिंदू स्मशानभूमीचा परिसर समस्यांच्या विळख्यात सापडल्यामुळे परिसराला कुंपण लावून येथे सौंदर्यीकरण करणे गरजेचे झाले आहे. स्मशानभूमीत हातपंप बसविण्याची मागणीही होत आहे.
मंगरू ळपीर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्याजवळ महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामामागील भागात गवळीपुरा परिसराला लागून हिंदू स्मशानभूमी आहे. या परिसरालगतच एक उर्दू शाळा आणि जिल्हा परिषदेकडून नगर परिषदेच्या अख्त्ययारीत देण्यात आलेली प्राथमिक मराठी शाळाही आहे. असे असतानाही परिसरातील काही व्यक्ती खासगी कामांसाठी या जागेचा वापर करीत असल्यामुळे परिसरात घाण, कचर्‍याचे साम्राज्य पसरत आहे. स्मशानभूमीत दहनविधीसाठी ओटा आणि शेडही उभारण्यात आले आहे; परंतु त्याची उंची पाहता त्या शेडचा क ाहीच फायदा असल्याचे दिसत नाही. पावसाळय़ाच्या दिवसात जवळपासच्या भागात पाणी साचल्यामुळेही अंत्ययात्रेत सहभागी व्यक्तींना चिखल तुडवत जावे लागते. त्याशिवाय जवळपास राहणारे लोक या परिसरात प्रात:विधी उरकत असल्यामुळे सर्वत्र घाण होत असून, अंत्यविधीमधील लोकांना चिखल आणि घाणीतच उभे राहावे लागते. नगर परिषदेने गावातील घन कचरा टाकण्याठी जागा सोडली असतानाही न.प.चे सफाई कामगार काही ृदिवसांपासून स्मशानभूमीमधील शेडजवळच कचरा टाकत असल्यामुळे येथे कचर्‍यांचे ढिगही तयार झाले आहेत. स्मशानभूमीत हातपंपही नसल्यामुळे हिंदू रितीरिवाजानुसार अंतिम संस्कार करताना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. गत काही वर्षांपूर्वी नगर परिषदेने स्मशानभूमी परिसरात पाण्याची व्यवस्था करण्यासाठी हातपंप बसविला होता; परंतु थोड्याच दिवसांत कु प्रवृत्तीच्या व्यक्तींनी त्याची मोडतोड केली. त्यानंतर पुन्हा एकदा नगर परिषदेकडून या ठिकाणी हातपंप बसविण्यात आला; परंतु त्या हातपंपाचीही मोडतोड करण्यात आली. त्यानंतर मात्र आजवर येथे हातपंप बसविण्यात आलेला नाही. स्मशानभूमीच्या परिसरात एकही वृक्ष नसल्यामुळे उन्हाळय़ाच्या दिवसांत अंत्यविधीसाठी येणार्‍यांना रखरखत्या उन्हात बसावे लागते. प्रशासनाने वरील समस्या लक्षात घेऊन स्मशानभूमी परिसराला किमान तार कुंपण लावून विविध सोयीसुविधा उपलब्ध करण्यासह सौंदर्यीकरणाचे काम तात्काळ सुरू करणे आवश्यक झाले आहे.

Web Title: The graveyard area is known for various problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.