ग्रामसेवकास मारहाण; गुन्हा दाखल

By Admin | Updated: December 11, 2015 02:29 IST2015-12-11T02:29:44+5:302015-12-11T02:29:44+5:30

शासकीय कामात अडथळा आणून ग्रामसेवकास शिवीगाळ व मारहाण;गुन्हा दाखल

Gramsevas beat up; Filed the complaint | ग्रामसेवकास मारहाण; गुन्हा दाखल

ग्रामसेवकास मारहाण; गुन्हा दाखल

मंगरुळपीर (जि. वाशिम): शासकीय कामात अडथळा आणून ग्रामसेवकास शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी सायखेडा येथील खुशाल जाधव याच्याविरुद्ध १0 डिसेंबर रोजी स्थानिक पोलीस स्टेशनला विविध कलमान्वये पोलिसांनी गुन्हे दाखल केले. मंगरुळपीर येथील श्रद्धा झेरॉक्स सेंटरसमोर फिर्यादी ग्रामसेवक विजय वानखडे हे झेरॉक्स काढीत असताना आरोपीने घरकुलाचे कागदपत्रावर स्वाक्षरी मागितली. फिर्यादीने घरकुलाची सद्य:स्थितीची पाहणी करून स्वाक्षरी देतो असे म्हटले असता आरोपीने शिवीगाळ व मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला, अशी तक्रार ग्रामसेवक वानखडे यांनी दिली. या तक्रारीहून मंगरुळपीर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३५३, ३३२, ५00, ५0६ विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास मंगरुळपीरचे ठाणेदार अनिलसिंह गौतम यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहेत.

Web Title: Gramsevas beat up; Filed the complaint