शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसभेचा ठराव असला तरच कर्मचाऱ्यांना मिळणार घरभाडे भत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 18:17 IST

हा ठराव नसल्यास संबंधित कर्मचाºयांना घरभाडे भत्त्याला मुकावे लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील वर्ग तीनच्या कर्मचाºयांना यापुढे मुख्यालयी राहण्यासंदर्भात ग्रामसभेचा ठराव सादर करावा लागणार आहे. हा ठराव नसल्यास संबंधित कर्मचाºयांना घरभाडे भत्त्याला मुकावे लागणार आहे. ग्रामविकास विभागाच्या ९ सप्टेंबरच्या आदेशाची अंमलबजावणी सप्टेंबर महिन्याच्या वेतनापासून केली जाणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनातर्फे ग्रामीण भागात विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. याकरीता जिल्हा परिषदेमार्फत नियुक्त केल्या जाणाºया वर्ग तीनच्या कर्मचाºयांना या योजना ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहचविण्याची जबाबादारी सोपविण्यात आली आहे. या सेवा विचारात घेऊन ग्रामविकास विभागाने या कर्मचाºयांना मुुख्यालयी राहणे बंधनकारक केले आहे. त्यातील प्रामुख्याने ग्रामसेवक, आरोग्य सेवक व शिक्षकांना मुख्यालयी राहणे आवश्यक आहे. असे असताना बºयाच वेळा संबंधित कर्मचारी स्थानिक सरपंचांचे दाखले सादर करून मुख्यालयी राहत असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. वास्तवात संबंधित कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याचे ग्रामविकास विभागाच्या निदर्शनात आले. ही बाब पंचायत राज समितीच्या २०१७-१८ च्या अहवालात प्रामुख्याने नमूद करण्यात आली. त्यामध्ये ग्रामीण भागातील कर्मचाºयांनी मुख्यालयी राहणे आवश्यक असल्याचेही नमूद करण्यात आले.  या पृष्ठभूमीवर ग्रामविकास विभागाने ९ सप्टेंबर रोजी शासन आदेश जारी करीत जिल्हा परिषदेच्या वर्ग तीनच्या कर्मचाºयांना मुख्यालयी राहणे बंधनकारक केले.  जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सहायक यांनी मुख्यालयी राहत असल्याबाबत ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेचा ठराव घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. हा ठराव नसल्याच घरभाड्डे भत्ता मिळणार नाही. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असून, सप्टेंबरच्या वेतन देयकासाठी ग्रामसभेचा ठराव जोडावा लागणार आहे. 

ग्रामविकास विभागाच्या निर्णयाची अंमलबजावणी वाशिम जिल्ह्यात केली जात आहे. संबंधित सर्व कर्मचाºयांनी मुख्यालयी राहावे, अशा सूचना देण्यात आल्या. याऊपरही कुणी मुख्यालयी राहत नसेल, ग्रामसभेचा ठराव जोडत नसेल तर नियमानुसार कारवाई करण्याच्या सूचना विभाग प्रमुख, गटविकास अधिकाºयांना दिल्या जातील.- दीपक कुमार मीनामुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद वाशिम.

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायत