वृक्षलागवड मोहिमेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींचा होणार सन्मान!
By Admin | Updated: May 16, 2017 20:09 IST2017-05-16T20:09:16+5:302017-05-16T20:09:16+5:30
वाशिम : पन्नास कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत १ ते ७ जुलै २०१७ या कालावधीत राज्यात ४ कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.

वृक्षलागवड मोहिमेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींचा होणार सन्मान!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : पन्नास कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत १ ते ७ जुलै २०१७ या कालावधीत राज्यात ४ कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. या मोहिमेत सहभाग नोंदवून गावाच्या लोकसंख्येइतकी वृक्ष लागवड करणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचा स्वातंत्र्यदिनी १५ आॅगस्टला सन्मान केला जाईल, अशी घोषणा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी मंगळवारी केली.
वृक्षलागवड उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. वाशिम जिल्ह्याला ५ लक्ष ८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. यानुषंगाने ५ लक्ष २२ हजार वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत २ लक्ष ८३ हजार ५६५ खड्डे खोदण्यात आले आहेत. या सर्व खड्ड्यांचे जीपीएस मॅपिंग करण्यात येणार आहे. उर्वरित खड्डे ३१ मे २०१७ पर्यंत खोदून पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणाप्रमुखांना देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले. ग्रामपंचायतींनी वृक्षलागवड मोहिमेत विशेष उत्साह दाखवून ही मोहिम यशस्वी करावी. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींना सन्मानित केले जाईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले.