ग्रामपंचायत गैरव्यवहाराची चौकशी सुरु

By Admin | Updated: May 15, 2015 23:06 IST2015-05-15T23:06:43+5:302015-05-15T23:06:43+5:30

बोगस ग्रामसभा प्रकरण.

Gram Panchayat started inquiry of misuse | ग्रामपंचायत गैरव्यवहाराची चौकशी सुरु

ग्रामपंचायत गैरव्यवहाराची चौकशी सुरु

राजुरा (जि. वाशिम) : मालेगाव पंचायत समिती अंतगर्ंत येत असलेल्या मौजे राजुरा येथील ग्रामपंचायतेच्या सरपंच व सचिवांनी ग्रामस्थांची दिशाभूल करुन १५ ऑगस्ट २0१४ रोजी ग्रामसभा घेतल्याचे दाखवून या ग्रामसभेत गावचे गुरे चराईसाठी असलेली सार्वजनिक शेतजमिनी नाहरकत प्रमाणपत्र पिंपळवाडी येथील काही जणांना देवाण - घेवाण करुन दिल्याची तक्रार राजुरा येथील सामाजिक कार्यकर्ते मनिष दत्तराव मोहळे यांनी ६ एप्रिल २0१५ रोजी गटविकास अधिकारी मालेगाव यांच्याकडे केली होती. या प्रकरणाच्या चौकशीस प्रारंभ झाला आहेत्र सदरहू तक्रार देवून जवळपास दिड महिन्याचे तर कालावधी होवूनही चौकशी सुरु झाली नसताना मनिष मोहळे यांनी वरिष्ठांना १२ मे २0१५ रोजी वरिष्ठांकडे रितसर नव्याने तक्रार दाखल करताच पंचायत समिती प्रशासनात एकच खळबळ उडाली होती. सदरहू तक्रारीची दखल घेत १५ मे २0१५ रोजी तपास अधिकारी घुगे यांनी प्रत्यक्ष राजुरा येथे येवून तपासाला प्रारंभ केला आहे. सदरहू प्रकरणात दाखविण्यात आलेल्या उपस्थिती रजिस्टरवरील बहुतांश स्वाक्षर्‍यापैकी काही स्वाक्षर्‍या या केवळ ध्वजारोहणासाठी तर काही स्वाक्षर्‍या या गावामध्ये विकास योजना आणण्यासाठी तर काहीना गावातील पाणीटंचाई कायमस्वरुपी निकाली काढण्यासाठी होत असल्याची बतावणी करुन घेण्यात आल्याचा आरोप तक्रारकर्ते मनिष मोहरे यांच्यासह काही ग्रामसभेच्या उपस्थिती रजिस्टरवरील स्वाक्षरी केलेल्या नागरिकांनी केला आहे. बोगस ग्रामसभेतील अतिक्रमणीत शेतजमिनीच्या नाहरकत प्रमाणपत्रासह इतरही गैरप्रकारांच्या चौकशीला नुकताच प्रारंभ झाल्याने या प्रकरणात यापुढे काय होणार या बाबतची उत्सुकता जनतेला लागली आहे.

Web Title: Gram Panchayat started inquiry of misuse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.