ग्रामपंचायत सदस्यांना ‘शौचालय’ भोवले!

By Admin | Updated: March 4, 2016 02:10 IST2016-03-04T02:10:45+5:302016-03-04T02:10:45+5:30

पाच ग्रामपंचायत सदस्यांना सदस्य पदाकरिता अपात्र घोषित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय.

Gram Panchayat members have 'toilets'! | ग्रामपंचायत सदस्यांना ‘शौचालय’ भोवले!

ग्रामपंचायत सदस्यांना ‘शौचालय’ भोवले!

वाशिम : शौचालय व जातवैधता प्रमाणपत्र नसल्याने तामसाळा, बोराळा हिस्से ग्रामपंचायतीच्या पाच सदस्यांना अपर जिल्हाधिकार्‍यांच्या न्यायालयाने अपात्र घोषित करण्याचा आदेश २९ फेब्रुवारी रोजी दिला. वाशिम तालुक्यातील बोराळा हिस्से येथील मुरलीधर सखाराम उंडाळ यांनी बेबी गोटे, प्रयाग धोंगडे, सोपान इंगोले या ग्रामपंचायत सदस्यांकडे शौचालय नाहीत, तसेच बुद्धू कासम जानीवाले, रुख्मीना हसबे या ग्रामपंचायत सदस्यांकडे जातवैधता प्रमाणपत्र, तसेच शौचालय नसल्याबाबत अपर जिल्हाधिकारी वाशिम यांच्या न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर गैरअर्जदारांकडे शौचालय व शौचालयाचा वापर होत नसल्याचे आढळून आले. अर्जदार मुरलीधर सखाराम उंडाळ यांनी गैरअर्जदार यांना मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ (ज-५) नुसार अपात्र करणेबाबतचा अर्ज मान्य करण्यात आला. उपरोक्त पाच ग्रामपंचायत सदस्यांना सदस्य पदाकरिता अपात्र घोषित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय अपर जिल्हाधिकार्‍यांच्या न्यायालयाने दिला. अर्जदारातर्फे अँड.एम.एस. गवई तर गैरअर्जदारातर्फे अँड. संतोष पोफळे यांनी बाजू मांडली.

Web Title: Gram Panchayat members have 'toilets'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.