ग्रामपंचायत सदस्यांच्या निवडणूक खर्च र्मयादेत बदल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 01:52 IST2017-09-15T01:52:01+5:302017-09-15T01:52:12+5:30
ग्रामपंचायत सदस्यपदाची निवडणूक लढविणार्या उमेदवारांच्या निवडणूक खर्च र्मयादेत बदल करण्यात आला असून, सदस्य संख्येनुसार नवीन खर्च र्मयादा निश्चित करण्यात आल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

ग्रामपंचायत सदस्यांच्या निवडणूक खर्च र्मयादेत बदल!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: ग्रामपंचायत सदस्यपदाची निवडणूक लढविणार्या उमेदवारांच्या निवडणूक खर्च र्मयादेत बदल करण्यात आला असून, सदस्य संख्येनुसार नवीन खर्च र्मयादा निश्चित करण्यात आल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक येत्या ७ ऑक्टोबर २0१७ रोजी होत असून ही निवडणूक पारदश्री व निर्भय वातावरणात होण्यासाठी जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही सहारिया यांनी दिल्या. यावेळी राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चóो, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कापडे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना राज्य निवडणूक आयुक्त सहारिया म्हणाले की, यावेळी प्रथमच थेट जनतेतून सरपंचाची निवड होणार आहे. त्यामुळे प्रत्येक मतदाराला त्यांच्या प्रभागातील सदस्यपदाच्या उमेदवारांसोबतच सरपंचपदाच्या उमेदवारास एक मत द्यावे लागणार आहे. मतदान यंत्रावर (ईव्हीएम मशीन) लावण्यात येणार्या बॅलेट पेपरमध्ये अनुसूचित जाती प्रवगार्साठी राखीव जागेवरून निवडणूक लढविणार्या उमेदवारांसाठी फिकट गुलाबी, अनुसूचित जमाती प्रवगार्साठी राखीव जागेवरून निवडणूक लढविणार्या उमेदवारासाठी फिकट हिरवा, इतर मागासवर्ग प्रवगार्साठी फिकट पिवळा, सर्वसाधारण प्रवर्गातून निवडणूक लढविणार्या उमेदवारासाठी पांढरा बॅलेट पेपर वापरला जाणार असून, सरपंच पदासाठी निवडणूक लढविणार्या उमेदवारांसाठी फिकट निळा बॅलेट पेपर वापरला जाणार आहे.
ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासाठी निवडणूक लढविणार्या सर्वच उमेदवारांना यापूर्वी २५ हजार रुपयेपर्यंत खर्च करण्याची र्मयादा होती. त्यात बदल करण्यात आला असून, ग्रामपंचायतीच्या आकारमानानुसार निवडणूक खर्च निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये ७ व ९ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सदस्य पदाच्या उमेदवारास २५ हजार रुपये, ११ व १३ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ३५ हजार रुपये आणि १५ व १७ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये ५0 हजार रुपये खर्च करता येणार आहे. तसेच सरपंचपदासाठी ७ व ९ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये ५0 हजार रुपये, ११ व १३ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये १ लक्ष रुपये आणि १५ ते १७ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये १ लक्ष ७५ हजार रुपयेपर्यंत खर्च करण्याची मुभा राहणार असल्याचे निवडणूक आयुक्त सहारिया यांनी यावेळी सांगितले.
नामनिर्देशनपत्र, घोषणापत्र सादर करणे आवश्यक
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १५ ते २२ सप्टेंबर या कालावधीत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी नामनिर्देशनपत्र स्वीकारली जाणार असून, ती संगणकीकृत असणे आवश्यक आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या लिंकवरून उमेदवारांना आपले अर्ज, घोषणापत्र भरता येतील. सेतू, महा ई-सेवा केंद्रांमधूनदेखील उमेदवारी अर्ज भारता येणार आहेत. संपूर्ण अर्ज, घोषणापत्र भरल्यानंतर उमेदवारांनी त्याची प्रिंट काढावी, त्यावर स्वाक्षरी करून हा अर्ज २२ सप्टेंबरपर्यंत निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे सादर करावा. अंतिम दिवशी ऑनलाइन अर्ज भरताना होणारी धावपळ टाळण्यासाठी उमेदवारांनी १५ सप्टेंबरपासूनच अर्ज भरण्यास सुरुवात करावी, असे निवडणूक आयुक्त सहारिया म्हणाले.
निवडणूक काळात कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी महसूल व पोलीस प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या असून, सामाजिक तेढ निर्माण करणार्या लोकांवर कारवाई करण्यासह इतर अनुषंगिक उपाययोजनांचा त्यामध्ये समावेश आहे. निवडणुकीदरम्यान दारूचे वाटप, पैसे वाटप करून मतदारांना प्रलोभन दाखविण्याचे प्रकार घडू नयेत, यासाठी भरारी पथके स्थापन केली जाणार आहेत.