ग्रामपंचायतला कुलूप; रिकाम्या हाती परतले चौकशी अधिकारी!
By Admin | Updated: March 31, 2017 20:01 IST2017-03-31T20:01:39+5:302017-03-31T20:01:39+5:30
पार्डी ताड येथील ग्रामपंचायत सचिवाबाबत आर्थीक व्यवहारातील गैरप्रकाराची तक्रारीवरुन अधिकारी चौकशीसाठी गेले होते. ग्रामपंचायतला कुलूप लागलेले असल्याने चौकशी अधिकाऱ्यांना खाली हात परतावे लागले.

ग्रामपंचायतला कुलूप; रिकाम्या हाती परतले चौकशी अधिकारी!
पार्डी ताड : मंगरुळपीर तालुक्यातील पार्डी ताड येथील ग्रामपंचायत सचिवाबाबत आर्थीक व्यवहारातील गैरप्रकाराची तक्रारीवरुन अधिकारी चौकशीसाठी गेले होते. ग्रामपंचायतला कुलूप लागलेले असल्याने चौकशी अधिकाऱ्यांना खाली हात परतावे लागले.
पार्डी ताड येथील ग्रामपंचायत सचिव दिपा सुर्वे यांनी केलेल्या आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी पार्डी ताड येथील ग्रामपंचायत सदस्य विजय लांभाडे, भानुदास गावंडे, गजानन टोंचर यांनी केली होती. त्यांनी तक्रारी म्हटले होते की, ग्रामपंचायतमध्ये झालेल्या जमा खचार्बाबत तसेच ग्रामपंचायतच्या मासिक सभेबाबत व ग्रामसभेबाबत लेखी माहिती मागीतली असता सचिवांच्यावतिने टाळाटाळ केल्या जाते. तसेच ते रुजू झाल्यापासून मोठया प्रमाणात भ्रष्टाचार व गैरव्यवहार केल्याचे म्हटले आहे. त्याकरिता तेराव्या वित्त आयोग, चौदावा वित्त आयोग , तंटामुक्ती पुरस्कार प्राप्त बक्षिस , ग्रामपंचायत घर टॅक्स, पाणी पट्टी वसुली इतर निधीची संपूर्ण ग्रामपंचायत रेकॉर्डची तपासणीची मागणी केली होती. या तक्रारीनुसार पंचायत समिती स्तरावरुन पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी आर. के. राऊत, विस्तार अधिकारी येवतकर गावात चौकशी करीता गेले असता ग्रामपंचायतला कुलूप आढळून आले. त्यामुळे अधिकाऱ्याना चौकशी न करताच खाली हात परतावे लागले.
---------------------
आमच्याकडे प्राप्त तक्रारीनुसार ग्रामपंचायत सचिव यांच्या
चौकशीकरिता पार्डी ताड येथे गेले असता तेथे ग्रामपंचायतला कुलूप आढळून आले. यामुळे या प्रकरणाची चौकशी होवू शकली नाही.
आर .के. राऊत
विस्तार अधिकारी, पं .स. मंगरुळपीर