लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : तालुक्यातील सावरगाव फॉरेस्ट येथे कार्यरत ग्रामपंचायत कर्मचारी २९ जुलैच्या पहाटे विज पडून ठार झाल्याची घटना घडली.तालुक्यातील तळप बु. गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या सावरगाव फॉरेष्ट येथील ग्रामपंचायत कर्मचारी शंकर राजु राठोड (४२) हे पत्नीसह शेतात वन्यप्राण्यांचे बंदोबस्ताकरीता शेतामध्ये जागलीला गेले होते . २९ जुलैच्या पहाटे विजेच्या गडगडासह पावसाने जोरदार हजेरी लावली . पावसामध्ये पहाटे तीन वाजता शंकर राठोड हे झोपडीच्या बाहेर आले असता विज पडुन ठार झाले . याप्रकरणी मानोरा पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे
विज पडून ग्रामपंचायत कर्मचारी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 13:37 IST