कोरोना नियमांच्या उल्लंघनप्रकरणी ग्रामपंचायतची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:39 IST2021-03-06T04:39:59+5:302021-03-06T04:39:59+5:30
गावपातळीवर कोरोना संसर्गाला लगाम घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन समितीला विशेष अधिकार दिले आहेत. त्या अनुषंगाने गावात विनामास्क फिरणाऱ्या ...

कोरोना नियमांच्या उल्लंघनप्रकरणी ग्रामपंचायतची कारवाई
गावपातळीवर कोरोना संसर्गाला लगाम घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन समितीला विशेष अधिकार दिले आहेत. त्या अनुषंगाने गावात विनामास्क फिरणाऱ्या ४ व्यक्ती, बंदच्या काळात सुरू असलेली ४ दुकाने तथा एका ठिकाणी विनापरवानगी साखरपुडा कार्यक्रमात गर्दी आढळून आल्याने ग्रामविकास अधिकारी जयकिसन आडे यांनी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रतिबंधात्मक कारवाई करून १ हजार १०० रुपयांचा दंड वसूल केला.
यावेळी ग्रा.पं. कर्मचारी गजानन वानखडे यांनी सहकार्य केले.
--------------
३५ लोकांची चाचणी
उंबर्डा बाजार: गेल्या काही दिवसांत गावात आढळून आलेल्या कोरोना बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची माहती घेत त्यांची कोरोना चाचणी आरोग्य विभागाने सुरू केली आहे. यात शुक्रवारपर्यंत ३५ जणांची चाचणी करण्यात आली.
------------------
येवता येथे ग्रामस्थांना मार्गदर्शन
उंबर्डा बाजार: येथून जवळच असलेल्या येवता बंदी येथे कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करण्याबाबत आरोग्य विभागाच्या पथकाने शुक्रवारी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. यावेळी नियमांचे पालन करण्यात आले.