अनसिंग जैन महाविद्यालयात पदवीदान सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:24 IST2021-07-24T04:24:23+5:302021-07-24T04:24:23+5:30

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था सचिव आदित्य कुमार वाळली, तर प्रमुख पाहुणे म्हणून तुळशीराम जाधव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मधुकर रावजी गावंडे, ...

Graduation Ceremony at Ansing Jain College | अनसिंग जैन महाविद्यालयात पदवीदान सोहळा

अनसिंग जैन महाविद्यालयात पदवीदान सोहळा

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था सचिव आदित्य कुमार वाळली, तर प्रमुख पाहुणे म्हणून तुळशीराम जाधव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मधुकर रावजी गावंडे, अनसिंगच्या ठाणेदार नैना पोहेकर व प्राचार्य डॉ. विवेक गुल्हाने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. मंचावर उपस्थित मान्यवरांचे स्वागत झाल्यानंतर महाविद्यालयातील प्रतिभा आडे, सागर निरगुडे, पवन शिंदे व अजय कालापाड यांचा गुणवंत विद्यार्थी म्हणून सत्कार करण्यात आला. ठाणेदार नैना पोहेकर, प्राचार्य डॉ. मधुकर गावंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पदवीदान कार्यक्रमात एकूण ५२ विद्यार्थ्यांना पदवीचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्वच प्राध्यापकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग उपस्थित होता. सूत्रसंचालन प्रा.डॉ. गजानन बनचरे यांनी, तर आभारप्रदर्शन प्रा.डॉ. एस. एस. बिचेवार यांनी केले.

Web Title: Graduation Ceremony at Ansing Jain College