शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विभागात दीड लाखांवर पदवीधर मतदारांची नोंदणी

By admin | Updated: November 6, 2016 02:02 IST

पाच जिल्हय़ातील पदवीधर मतदारांचा समावेश

अकोला, दि. ५- अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघातील पदवीधर मतदार नोंदणीच्या शेवटच्या दिवसापर्यंत (शनिवारी) अमरावती विभागात प्राथमिक माहितीनुसार १ लाख ५५ हजार १२४ पदवीधर मतदारांची नोंदणी करण्यात आली. त्यामध्ये विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्हय़ातील पदवीधर मतदारांचा समावेश आहे.अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघात विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्हय़ांचा समावेश आहे. पदवीधर मतदारसंघातील पदवीधर मतदारांची नोंदणी करण्याची मोहीम १ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत पाचही जिल्हय़ात राबविण्यात आली. पदवीधर मतदार नोंदणीत प्रत्येक जिल्हय़ात पदवीधर मतदारांचे अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. त्यामध्ये जिल्हय़ातील तालुक्यातील पदवीधर मतदारांचे अर्ज संबंधित तहसील कार्यालय, महानगरपालिका क्षेत्रातील पदवीधर मतदारांचे अर्ज पाच झोनस्तरावर आणि कर्मचारी पदवीधर मतदारांचे अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेत स्वीकारण्यात आले. पदवीधर मतदारांचे अर्ज स्वीकारण्याची मुदत शनिवार, ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३0 वाजेपर्यंत होती. मतदार नोंदणीमध्ये अर्ज स्वीकारण्याचा शेवटचा दिवस असल्याने, शनिवारी अर्ज सादर करण्यासाठी पदवीधर मतदारांची संबंधित कार्यालयांमध्ये गर्दी झाली होती. पदवीधर मतदारांकडून प्राप्त झालेल्या अर्जानुसार शनिवारी सायंकाळपर्यंत प्राथमिक माहितीनुसार अमरावती विभागातील पाचही जिल्हय़ात १ लाख ५५ हजार २१४ पदवीधर मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. पदवीधर मतदार नोंदणीत पदवीधर मतदारांचे प्राप्त अर्ज आणि करण्यात आलेल्या मतदार नोंदणीचे विभागातील सविस्तर चित्र रविवारी स्पष्ट होणार आहे.पाच जिल्हय़ातील अशी आहे मतदार नोंदणी!जिल्हा मतदारांचे प्राप्त अर्ज अकोला           २९५९४ अमरावती        ५५00६बुलडाणा          ३४७६३वाशिम            १८६२६यवतमाळ        १७१४८वि.आयुक्त कार्यालय ७७.........................एकूण              १५५२१४