शासकीय शीतकरण केंद्राचे ‘दूध’ आटले
By Admin | Updated: September 7, 2014 03:04 IST2014-09-07T03:04:40+5:302014-09-07T03:04:40+5:30
कारंजालाड येथील दूध शितकरण प्रकल्पाला पाच वर्षापासून टाळे; पाच कोटी ‘पाण्यात’

शासकीय शीतकरण केंद्राचे ‘दूध’ आटले
डॉ.दिवाकर इंगोले /कारंजा लाड
शहरालगतच्या धनज बुद्रूक रस्त्यावर तीन एकर जागेत महाराष्ट्र शासनाने उभारलेल्या शि तकरण केंद्राला मागील चार ते पाच वर्षापासून टाळं लागले असल्याने शासनाचे तब्बल पाच कोटी रूपये पाण्यात गेले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने धनज बु. रस्त्यावर दूध शितकरण केंद्र उभारण्यात आले होते. सुरूवातीच्या दिवसात या प्रकल्पाला उत्पादकांनी मोठय़ा प्रमाणात दूध पुरविले. उत् पादकांकडून घेतलेले दूध अकोला येथील मोठय़ा प्रकल्पाकडे पाठविण्याची जबाबदारी ये थील केंद्र संचालकाकडे होती. शितकरण केंद्राला दूध दिल्यावर नगदी मूल्य न मिळणे तथा खाजगी बाजारात दूधाला जादा दर मिळत असल्याने दूध उत्पादकांनी या प्रकल्पाला पाठ दाखविली. त्यामुळे मागील पाच ते सहा वर्षापूर्वी या केंद्राला टाळं लागले. केंद्र संचालक म्हणून काम करणारे किशोर उपाध्ये यांचेसह इतर कर्मचार्यांचे शासनाने समायोजन झाले. परंतु आजही प्रवर्ग चारचे तीन कर्मचारी या बंद प्रकल्पावर काम करीत आहे. त्यांना प्रत्येकी मिळणारे १५ हजार वेतन तसेच वीजेचे बिल ५ हजार अशाप्रकारे महिन्याकाठी ५0 हजार रूपये शासनाचे बंद प्रकल्पावर खर्च होत आहे. दरम्यान, शासनाने ही जागा इतर कार्यालयासाठी वळती करावी, अशी मागणी होत आहे.
** मशिनरी धूळ खात
येथील दूध शितकरण केंद्र सुरू असताना शासनाने महागड्या मशिनरी या केंद्रात बसविल्या होत्या. कालांतराने हा प्रकल्प बंद पडला. मात्र यामधील दूध थंड ठेवण्यासाठी असलेली मशिन व इतर साहित्य अजूनही धूळखात आहे. खाजगी बाजारपेठेत दूधाला २५ ते ३0 रूपये लिटरचे भाव मिळत असताना या केंद्रात उत्पादकांच्या दूधाला केवळ १५ रूपयाचा भाव दिला जात होता. सध्या बाजारपेठेत ४0 रूपये प्रति लिटर दूधाला भाव मिळतो. शासनाने उत्पादकांच्या दूधाला एवढा भाव दिला तरच या प्रकल्पाला संजीवनी मिळू शकते.