गुरुवारपर्यंत शासकीय कार्यालये बंदच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:42 IST2021-05-19T04:42:05+5:302021-05-19T04:42:05+5:30

जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय व ...

Government offices closed till Thursday! | गुरुवारपर्यंत शासकीय कार्यालये बंदच !

गुरुवारपर्यंत शासकीय कार्यालये बंदच !

जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय व निमशासकीय कार्यालये तसेच खासगी कार्यालये व आस्थापना बंद २० मेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. केवळ अत्यावश्यक सेवा व कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेशी संबंधित महसूल विभाग, पोलीस विभाग, ग्रामपंचायत, आरोग्य सेवा, नगरपालिका आदी. तसेच अत्यावश्यक सेवेअंतर्गत महावितरण, कोषागार, पाणी पुरवठा, स्वच्छता, दूरसंचार, उपप्रादेशिक परिवहन इत्यादी शासकीय कार्यालये सुरू राहणार आहेत. इतर कार्यालयांना आपले कामकाज ऑनलाइन सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली. शासकीय यंत्रणांना मान्सूनपूर्व विकासकामे, आवश्यक पाणीपुरवठा व टंचाईविषयीची कामे करता येतील. त्यासाठी त्यांना वेगळ्या परवानगीची गरज नाही. सर्व शासकीय कार्यालये अभ्यागतांसाठी पूर्णत: बंद ठेवण्यात आली आहेत. अतिआवश्यक कामांसाठी ८३७९९२९४१५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले.

Web Title: Government offices closed till Thursday!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.