शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

दुधाच्या शासकीय दरात केवळ एक रुपयाने वाढ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 5:17 PM

दुधाच्या शासकीय दरात केवळ एका रुपयाने वाढ केल्याने दुध उत्पादक शेतकरी संतप्त झाले.

वाशिम : शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धोत्पादन करण्याचा सल्ला कृषी व पशुसंवर्धन विभागातर्फे दिला जातो. परंतू, दुधाच्या शासकीय दरात अपेक्षेप्रमाणे वाढ होत नसल्याने दुध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. १२ आॅक्टोबर रोजी दुधाच्या शासकीय दरात केवळ एका रुपयाने वाढ केल्याने दुध उत्पादक शेतकरी संतप्त झाले.शेतकºयांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध योजना राबविण्यात येतात. सोबतच जोडधंदा म्हणून दुग्धोत्पादनाकडे वळावे असाही सल्ला देण्यात येतो. वाशिमसह विदर्भात बºयापैकी दुग्धोत्पादन होते. अनेक पशुपालक हे खासगी पद्धतीने गाव, शहर परिसरात दुध विक्री करतात तर काही शेतकरी हे शासकीय दुध संकलन केंद्राकडे दुधाची विक्री करतात. दुधाच्या दरात वाढ, वितरक कमिशनमध्ये वाढ करण्याची मागणी अनेक दिवसांपासूनची आहे. १२ आॅक्टोबर रोजी आरे शक्ती गाय दूध, फुल क्रीम दूध या प्रकारातील दुध विक्रीत प्रती लिटरने एका रुपयाची वाढ करण्यात आली. आरे शक्ती गाय दूधाचे पूर्वीचे दर हे प्रती लिटर ४१ रुपये होते. आता या दरात एक रुपयाने वाढ करीत ४२ रुपये दर करण्यात आले. फुल क्रिम दूध हे ४६ रुपयावरून ४७ रुपये प्रती लिटर असे दर करण्यात आले. अन्य प्रकारच्या शासकीय दूधाच्या प्रती लिटर किंमतीतही किमान ४ ते ५ रुपयाने वाढ करण्याची मागणी दुध उत्पादक शेतकºयांमधून होत आहे. दुध उत्पादक शेतकºयांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. महागाईच्या काळात दुधाच्या शासकीय दरात किमान ४ ते ५ रुपयाने वाढ करावी, अशी अपेक्षा आहे.- दिलीप पंडीतराव सरनाईकशेतकरी, शेलगाव बगाडे ता. मालेगाव ज्.िवाशिम

टॅग्स :washimवाशिमmilkदूधFarmerशेतकरी