३८.८0 कोटीचा निधी वितरणास शासनाची मंजुरी
By Admin | Updated: February 28, 2015 00:55 IST2015-02-28T00:55:37+5:302015-02-28T00:55:37+5:30
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी भरीव तरतुद.

३८.८0 कोटीचा निधी वितरणास शासनाची मंजुरी
वाशिम : अल्पसंख्यक समाजातील उच्च व्यावसायिक शिक्षण घेणार्या व इयत्ता बारावीनंतर सर्व अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेत असलेल्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत व गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांकरिता सुधारित शिष्यवृत्ती योजनेत राज्य शासनाने ३६.८0 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याबाबत अल्पसंख्यक विभागाने २४ फेब्रुवारी रोजी निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिष्यवृत्ती वितरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. या शिष्यवृत्तीसाठी शासनाने ९२ कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद सन २0१४-१५ मध्ये केली होती. यापैकी रुपये ५५.२0 कोटी इतका निधी संचालक तंत्र शिक्षण, तंत्र शिक्षण संचालनालय यांना ३0 जून व १२ सप्टेंबर या शासन निर्णयान्वये वितरीत करण्यात आला होता. उर्वरित रुपये ३६.८0 कोटीमधून उपरोक्त योजनेकरिता आवश्यक निधी वितरीत करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यानुसार सन २0१४-१५ या आर्थिक वर्षासाठी उच्च व्यावसायिक व इयत्ता १२ वी नंतर सर्व अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणार्या राज्यातील अल्पसंख्यक विद्यार्थ्यांंकरिता शिष्यवृत्ती योजनेसाठी १00 टक्के अर्थसंकल्पीय तरतूद रुपये ९२ कोटी अंमलबजावणी यंत्रणांना वितरीत करण्यास नियोजन व वित्त विभागाने मान्यता दर्शविली आहे. त्यापैकी रु पये ५५.२0 कोटीचा निधी यापूर्वीच संचालक तंत्रशिक्षण संचलनालय यांना वितरीत करण्यात आला आहे. उर्वरित ३६.८0 कोटी इतका निधी अर्थसंकल्प वितरण प्रणालीतून आहरण व संवितरण करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. हा निर्णय राज्य शासनाच्या अल्पसंख्यक विभागाने २४ फेब्रुवारी रोजी घेतला आहे. या निधीपैकी २२ कोटी १५ लाख ६२ हजार ६८८ रुपये इतका निधी संचालक , तंत्रशिक्षण संचलनालय यांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. सदर निधीपैकी इ.१२ वी नंतरच्या सर्व अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणार्या राज्यातील अल्पसंख्यक विद्यार्थ्यांंकरिता शिष्यवृत्ती योजनेसाठी रुपये १ कोटीच्या र्मयादेत निधी वितरीत करण्यात येणार आहे. तर यातील उर्वरित निधीपैकी रु पये १0.१0 कोटी इतका निधी संचालक, वैद्यकीय शिक्षण संशोधन संचलनालय यांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. त्यामुळे अल्पसंख्यक विद्यार्थ्यांंना सदरची शिष्यवृत्ती लवकरच मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.