२0 हजार युवकांना रोजगार मिळवून देण्याचे शासनाचे उद्दिष्ट!

By Admin | Updated: October 25, 2016 02:10 IST2016-10-25T02:10:53+5:302016-10-25T02:10:53+5:30

उद्योजकता विभागाला देण्यात आले १२ ‘केआरए’

Government aims to get employment of 20 thousand youth! | २0 हजार युवकांना रोजगार मिळवून देण्याचे शासनाचे उद्दिष्ट!

२0 हजार युवकांना रोजगार मिळवून देण्याचे शासनाचे उद्दिष्ट!

वाशिम, दि. २४- रोजगार प्रोत्साहन कार्यक्रमांतर्गत ३१ मार्च २0१७ पर्यंंंत किमान २0 हजार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्या, असे स्पष्ट निर्देश कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने आपल्या अधिनस्त असलेल्या वरिष्ठ अधिकार्‍यांना दिले आहेत. बेरोजगारीच्या गंभीर प्रश्नावर मात करण्यासाठी संबंधित अधिकार्‍यांना नेमून दिलेल्या १२ ह्यकेआरएह्णमध्ये (की परफॉर्मन्स इन्डिकेटर्स्) ही बाब नमूद करण्यात आली आहे.
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता संचालनालयाचे आयुक्त, महाराष्ट्र कौशल्य विकास संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक आदींकरिता शासनाने विविध प्रकारचे १२ ह्यकेआरएह्ण नेमून दिले आहेत. ते ठराविक कालावधीत अर्थात ३१ मार्च २0१७ पर्यंंंत पूर्ण करावयाचे आहेत. त्यात विविध विभागांच्या समन्वय व सहभागातून वर्षाअखेरीस सुमारे २ लाख मनुष्यबळाला स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देणे, रोजगार प्रोत्साहन कार्यक्रमांतर्गत किमान २0 हजार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे, कौशल्य प्रशिक्षण देणार्‍या संस्थांच्या कार्यपद्धतीमध्ये पारदर्शकता आणण्याकरिता ह्यटेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्मह्ण उभारणे, नोंदणीकृत कौशल्य प्रशिक्षण देणार्‍या संस्थांची संख्या ७00 वरून १५00 करणे, प्रमोद महाजन कौशल्य विकास व उद्योजकता अभियानांतर्गत एक लाखापेक्षा अधिक युवकांचे कौशल्य विकसित करणे, यासह एकंदरित १२ प्रकारचे ह्यकेआरएह्ण अधिकार्‍यांना पूर्ण करावे लागणार आहेत.

Web Title: Government aims to get employment of 20 thousand youth!