पानठेल्यातून ४९ हजारांचा माल लंपास

By Admin | Updated: June 15, 2017 01:52 IST2017-06-15T01:52:31+5:302017-06-15T01:52:31+5:30

कारंजा : वाशिम रस्त्यावरील रिलायन्स पेट्रोल पंप परिसरात असलेल्या न्यू राधाकृष्ण हॉटेलनजीक पानठेला फोडून त्यातील मुद्देमालासह ४८ हजार ४६० रुपयांची चोरी केल्याची घटना १४ जून रोजी सकाळी उघडकीस आली.

The goods worth Rs | पानठेल्यातून ४९ हजारांचा माल लंपास

पानठेल्यातून ४९ हजारांचा माल लंपास

लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा : वाशिम रस्त्यावरील रिलायन्स पेट्रोल पंप परिसरात असलेल्या न्यू राधाकृष्ण हॉटेलनजीक पानठेला फोडून त्यातील मुद्देमालासह ४८ हजार ४६० रुपयांची चोरी केल्याची घटना १४ जून रोजी सकाळी उघडकीस आली.
दशरथ ज्ञानेश्वर रस्ते वय ५० रा. शिवाजी नगर यांनी याप्रकरणी कारंजा पोलिसांत फिर्याद दिली, की १३ जून रोजी पाणठेल्याला कुलूप लावून घरी निघून गेलो. दुसऱ्या दिवशी १४ जून रोजी सकाळी पानठेला फोडलेल्या अवस्थेत आढळला. पानठेल्यामधील वस्तू, जनरेटर, दोन सिलिंडर व नगदी दोन हजार रुपये असा एकूण ४८ हजार ४६० रुपयांचा माल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Web Title: The goods worth Rs