गोमातेस मिळणार ‘हक्काचं घर’
By Admin | Updated: November 15, 2014 00:56 IST2014-11-15T00:56:36+5:302014-11-15T00:56:36+5:30
कारंजा येथे गोशाळा, गोरक्षण संस्थेचा स्तुत्य उपक्रम.

गोमातेस मिळणार ‘हक्काचं घर’
योगेश यादव / कारंजा
बेवारस आणि कोंडवाड्यात ठेवण्यात आलेल्या गायींसह कत्तलीसाठी नेण्यात येणार्या गायी सोडवून त्यांचा अधिकृतपणे सांभाळ करण्याचा सेवाभावी आणि स्त्युत्य उपक्रम राबविण्याचा प्रयत्न गोरक्षण (पांजरापोळ) संस्था करणार असून, त्यासाठी शहरातील महावीर ब्रह्मचर्याश्रमजवळ संस्थेच्यावतीने अंदाजे १0 लाख रूपये खर्चून ह्यगोशाळाह्ण बांधण्यात येत आहे.
तेहतीस कोटी देवांचा वास असणार्या गायीकडून मिळणार्या दुधाच्या उत्पन्नातून आर्थिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न पशुपालकांकडून करण्यात येतो; परंतु तेच उत्पन्न बंद झाल्यावर त्या गायींना वार्यावर सोडून दिल्या जाते. अशा गायींचा सांभाळ करून पालनपोषण करण्यासाठीच गोरक्षण संस्थेच्यावतीने ह्यगोशाळाह्ण बांधण्यात येत आहे. त्यामुळे लवकरच बेवारस झालेल्या गोमातांना आपल्या हक्काचं घर मिळणार आहे.