सोन्याच्या दागिन्यांची चोरी

By Admin | Updated: May 30, 2014 01:14 IST2014-05-30T00:52:59+5:302014-05-30T01:14:45+5:30

रिसोड तालुक्यातील जोगेश्‍वरी येथे अज्ञात चोरटयांनी सोन्याच्या दागिन्यासह ८८ हजारांचा ऐवज लंपास केला.

Gold jewelery theft | सोन्याच्या दागिन्यांची चोरी

सोन्याच्या दागिन्यांची चोरी

शिरपूरजैन : रिसोड तालुक्यातील जोगेश्‍वरी येथे वीज भारनियनामुळे रात्री घराच्या छतावर झोपायला गेल्याच्या संधीचा फायदा घेवून २७ मे च्या रात्री अज्ञात चोरटयांनी ५0 ग्रॅम पाच तोळे सोन्याच्या दागिन्यासह ८८ हजारांचा ऐवज लंपास केला. भागवत वाळूकर हे आपल्या कुटुंबियासोबत २७ मे च्या रात्री वीज भारनियमनामुळे घराच्या छतावर झोपायला गेले.मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरटयांनी या संधीचा फायदा घेऊन घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला व चोरटयांनी घरा मधील सोन्याचा एक नेकलेस, गहूमनी,पदक, कानातील वेल असे ५0 ग्राम सोन्याचे दागिने व रोख ३ हजार रुपये असा ८८ हजाराचा ऐवज अज्ञात चोरटयांनी लंपास केला.

Web Title: Gold jewelery theft