गोदामाला आग; ३0 लाखाचे कपडे जळून खाक!
By Admin | Updated: March 9, 2017 02:05 IST2017-03-09T02:05:44+5:302017-03-09T02:05:44+5:30
रिसोड येथील घटना; १७ लघू व्यावसायिकांचे नुकसान.

गोदामाला आग; ३0 लाखाचे कपडे जळून खाक!
रिसोड (जि. वाशिम), दि. ८- स्थानिक पोलिस स्टेशननजिक असलेल्या लघूव्यावसायिक कापड गोदामाला अचानक लागलेल्या आगीत तब्बल ३0 लाख रुपयाचा माल जळून खाक झाला. ही घटना बुधवार, ८ मार्च रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.
घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासन व महसूल प्रशासनाने आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. तसेच अग्निमशन यंत्रणेनेही आगीवर नियंत्रण मिळविण्याचे कसून प्रयत्न केले. मात्र, तोपर्यंत लाखो रुपये किंमतीचे साहित्य बेचिराख झाले होते. प्रशासनाने घटनेचा पंचनामा केला असून १७ कापड व्यावसायिकांचा २९ लाख ७३ हजाराचा माल भस्मसात झाला.