बकरी चोरटे पोलिसांच्या जाळ्यात

By Admin | Updated: August 9, 2014 22:40 IST2014-08-09T22:03:30+5:302014-08-09T22:40:58+5:30

बकर्‍यांची चोरी करण्याचा गोरखधंदा करणार्‍या चोरट्यांचा एका पोलिस शिपायाने पाठलाग करून बकरीसह त्यांना अटक

The goats are in the thieves of the police | बकरी चोरटे पोलिसांच्या जाळ्यात

बकरी चोरटे पोलिसांच्या जाळ्यात

वाशिम: शेतामधील बकर्‍यांची चोरी करण्याचा गोरखधंदा करणार्‍या चोरट्यांचा एका पोलिस शिपायाने पाठलाग करून बकरीसह त्यांना अटक करण्यात यश प्राप्त केले. ही घटना धनज बु. पोलिस स्टेशन अंतर्गत ९ ऑगस्ट रोजी दुपारी ३:३0 वाजता घडली. गेल्या महिनाभरापासुन धनज बु. पोलिस स्टेशन अंतर्गत जनावरे चोरीच्या घटनेत सातत्याने वाढ होत आहे. या अनुषंगाने धनज बु. पोलिस स्टेशनचे ठाणेदार विलास चव्हाण यांनी गावागावामध्ये ग्राम सुरक्षा दल स्थापन केले आहेत. याशिवाय पोलिसांच्या गस्तीवरही त्यांनी भर दिला आहे. दरम्यान ९ ऑगस्ट रोजी दुपारी २:३0 वाजताचे सुमारास धनज येथील आशिष धनसिंग चव्हाण हा शेतशिवारामध्ये बकर्‍या चारत होता. यावेळी त्याठिकाणी एका मोटरसायकलवर दोन अज्ञात इसम आले त्यांनी आशिषची नजर चुकवून एक बकरी आपल्या मोटरसायकलवर ठेवून पसार झाले. ही घटना आशिषच्या लक्षात आल्यानंतर त्याने आरडाओरड केली. यावेळी पोलिस शिपाई गजानन काळे हे गस्तीवर होते. काळे यांनी घटनेची माहिती घेऊन ग्राम सुरक्षा दलातील सदस्य देवेंद्र नारायण लसणकार, मयुर मस्के, विलास गायधने, सुमित भिवरकर यांना सोबत घेऊन चोरट्यांचा सुमारे २0 कि.मी. पाठलाग करून त्यांना अटक करण्यात यश आले. मांगळा देवी ता. नेर जि. यवतमाळ येथील शेख गणी शेख मुस्सा व अतुल मनोहर घेटे असे या चोरट्यांची नावे आहेत. या दोघांविरूध्द धनज पोलिस स्टेशनमध्ये भादंविचे कलम ३७९, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: The goats are in the thieves of the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.