२.६५ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट!
By Admin | Updated: May 14, 2017 02:25 IST2017-05-14T02:25:02+5:302017-05-14T02:25:02+5:30
प्रशासकीय यंत्रणा खड्डे खोदण्याच्या कामात व्यस्त

२.६५ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट!
सुनील काकडे
वाशिम : शासनाने हाती घेतलेल्या ५0 कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत जिल्हय़ात २.६५ लाख वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणेकडून खड्डे खोदण्याची प्रक्रिया जोरात सुरू असून, किमान दोन फूट उंचीची झाडे उपलब्ध करण्यासाठी वन विभाग व सामाजिक वनीकरणाने धडपड चालविली आहे.
गतवर्षी ह्यएकच लक्ष्य-दोन कोटी वृक्षह्ण, या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत जिल्हाभरात २.२२ वृक्षांची जिल्ह्यात लागवड करण्यात आली होती. पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला हा उपक्रम पुढेही कायम ठेवण्याचा निर्धार शासनाने केला असून, आगामी तीन वर्षांत देशात किमान ५0 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट बाळगण्यात आले आहे.
त्यानुसार, १५ मे ते ७ जुलै असे जवळपास २२ दिवस वृक्ष लागवडीच्या कामाकडे विशेष लक्ष देण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी आतापासूनच सुरू झाली असून, प्रशासकीय यंत्रणांना विभागून दिलेल्या वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टानुसार ३१ मे पूर्वी खड्डे खोदून तयार ठेवण्यासाठी कर्मचार्यांनी पुढाकार घेतला आहे. यावर्षी २.६५ लाख वृक्षांची जिल्हाभरात लागवड केली जाणार असून, त्यासाठी विविध प्रजातींचे किमान दोन फूट उंचीचे वृक्ष तयार ठेवावेत, असे निर्देश वन विभाग, सामाजिक वनीकरणालाही देण्यात आले आहेत. त्या दृष्टीने सर्वंकष प्रयत्न सुरू असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.
२१ रोपवाटिकांमधून वृक्ष होणार उपलब्ध!
जिल्ह्यात वन विभागाच्या अखत्यारित १४ आणि सामाजिक वनीकरणकडे ७, अशा एकूण २१ रोपवाटिका आहेत. १५ जूनपासून सुरू होणार्या वृक्षलागवड मोहिमेकरिता या रोपवाटिकांमधून वृक्ष उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यानुसार, विभागनिहाय मागणीप्रमाणे किमान दोन फूट उंचीची झाडे तयार ठेवण्याकरिता वन विभाग आणि सामाजिक वनीकरणाने तयारी चालविली आहे.
विविध प्रशासकीय यंत्रणांमार्फत यंदा ह्यग्रीन आर्मीह्ण अर्थात हरित सेनेत सहभागी होऊ इच्छिणार्या नागरिकांची ह्यऑनलाइनह्ण नोंदणीचा उपक्रम राबविण्यात आला. त्यानुसार, जिल्ह्यात चार हजारांपेक्षा अधिक ह्यग्रीन आर्मीह्ण सदस्य तयार झाले असून, त्यांनाही वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी करून घेतले जाणार आहे.
अतिक्रमित "ई-क्लास" जमिनीवरही वृक्ष लागवड
वाशिम : देखभाल-दुरूस्ती व संरक्षणासाठी ग्रामपंचायतीच्या ताब्यात असणार्या ह्यई-क्लासह्ण जमिनींवरही वृक्षारोपण करण्याचा निर्णय वाशिम जिल्हा परिषदेने घेतला आहे. या निर्णयामुळे ह्यई-क्लासह्ण जमिनींवरील अतिक्रमण हटण्यासोबतच पर्यावरणाच्या संरक्षणाचा दृष्टिकोनही बहुतांशी साध्य होणार आहे. सध्या अतिक्रमित जमिनींवर कुठलेच पीक नसल्याने अतिक्रमकांचेही नुकसान होणार नाही. त्यामुळे अतिक्रमण झालेल्या सर्व जमिनी ग्रामपंचायतीने वृक्ष लागवडीसाठी ताब्यात घेऊन त्यावर खड्डे खोदून ठेवावे, अशा सूचना जिल्हा परिषद प्रशासनाने दिल्या आहेत.
१५ मे ते ७ जुलै यादरम्यान जिल्हाभरात वृक्ष लागवडीची मोहीम राबविली जाणार असून, त्यासाठी वन विभाग, सामाजिक वनीकरणच्या रोपवाटिकांमध्ये पुरेशी झाडे उपलब्ध आहेत. या अंतर्गत वन विभागाला १.५ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट मिळाले आहे.
- एस.आर.नांदुरकर
वनपरिक्षेत्राधिकारी, वाशिम