G.M. Bank Vice President felicitated at the fountain | जि.म. बँक उपाध्यक्षांचा कारंजात सत्कार

जि.म. बँक उपाध्यक्षांचा कारंजात सत्कार

माजी आमदार तथा बाजार समिती सभापती प्रकाश डहाके यांच्या गटातून श्रीधर पाटील कानकिरड यांनी दुसऱ्यांदा संचालक पदासाठी निवडणुक लढवून विजय संपादन केला. बँकेच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणूकीतही त्यांनी बाजी मारली. याप्रती त्यांचा खरेदी-विक्री संघ कार्यालयात शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन अध्यक्ष भाऊराव मते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाला खविसंचे माजी अध्यक्ष बाबाराव ठाकरे, माजी उपाध्यक्ष वसंतराव लळे, संचालक विनायक चौधरी, भारत गुंजाटे, उमेश बोरेकर, राजेंद्र लाहे, सुरेश अघम, अनिल चौधरी, जानराव राऊत, अजय रंगे, प्रभाकर वानखडे, निळकंठ गजभिये, रमेश जिरापुरे तसेच जि.प. सदस्य चंदूभाऊ डोईफोडे, माजी जि.प. उपाध्यक्ष अरूण ताथोड, बाबाराव पोले, विष्णू तिडके, देवेंद्र राऊत, दिवाकर ठाकरे, जगदेव पाटील यांच्यासह व्यवस्थापक आशिष ठाकरे व सर्व कर्मचारी उपस्थित होते. (वा.प्र.)

Web Title: G.M. Bank Vice President felicitated at the fountain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.