शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

रब्बी हंगामासाठी कालव्याद्वारे पाणी द्या!

By admin | Updated: November 12, 2014 01:48 IST

शेलु शेतक-यांची जिल्हाधिका-यांकडे धाव.

मंगरूळपीर (वाशिम) : शेतकर्‍यांना हरित क्रांतीचे स्वप्न दाखविणार्‍या सोनल प्रकल्पातून रब्बी हंगामासाठी कालव्याद्वारे त्वरित पाणी द्यावे, अशी मागणी शेलूबाजार परिसरातील शेतकर्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. जिल्हय़ातील मध्यम प्रकल्प म्हणून पाहिल्या जाते. या प्रकल्पात सध्या ७0 टक्के जलसाठा उपलब्ध असून, नापिकीवर मात करण्यासाठी व शेतकर्‍यांना आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्याकरिता सोनलच्या प्रकल्पाची दुरुस्ती करून त्वरित पाणी सोडण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी हिरंगी, येडशी, लाठी, वनोजा, शेलूबाजार, नागी, तपोवन, तर्‍हाळा, मसोला येथील शेतकर्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी राखीव जलसाठय़ासंदर्भात त्वरित निर्णय घेऊन रब्बी हंगामाचा लाभ शेतकर्‍यांना पुरेपूर मिळावा, याकरिता जिल्हा प्रशासनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यावर्षीच्या अत्यल्प पर्जन्यवृष्टीमुळे मुख्य सोयाबीन पिकांच्या उत्पादनात कमालीची घट आली आहे, त्यामुळे दुबार व तिबार पेरण्याचे पैसे वसूल झाले नाही, याचा परिणाम महत्त्वाच्या दिवाळी सणावरून दिसून आले. गेल्या दोन वर्षांपूर्वी सोनल प्रकल्पात ५६ टक्के जलसाठा असताना हरभरा पिकांसाठी ४ वेळा पाणी देण्यात आले होते. यंदा तर प्रकल्पात ७0 टक्के जलसाठा उपलब्ध आहे. १0 टक्के साठा राखीव ठेवून तर्‍हाळा दोन वेळापर्यंत ४ पाण्याची व्यवस्था होऊ शकते. राखीव जलसाठय़ाचा निर्णय त्वरित होऊन पाणी सोडण्याची मागणी जोर धरत आहे.