रब्बी हंगामासाठी कालव्याद्वारे पाणी द्या!
By Admin | Updated: November 12, 2014 01:48 IST2014-11-12T01:48:22+5:302014-11-12T01:48:22+5:30
शेलु शेतक-यांची जिल्हाधिका-यांकडे धाव.

रब्बी हंगामासाठी कालव्याद्वारे पाणी द्या!
मंगरूळपीर (वाशिम) : शेतकर्यांना हरित क्रांतीचे स्वप्न दाखविणार्या सोनल प्रकल्पातून रब्बी हंगामासाठी कालव्याद्वारे त्वरित पाणी द्यावे, अशी मागणी शेलूबाजार परिसरातील शेतकर्यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. जिल्हय़ातील मध्यम प्रकल्प म्हणून पाहिल्या जाते. या प्रकल्पात सध्या ७0 टक्के जलसाठा उपलब्ध असून, नापिकीवर मात करण्यासाठी व शेतकर्यांना आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्याकरिता सोनलच्या प्रकल्पाची दुरुस्ती करून त्वरित पाणी सोडण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी हिरंगी, येडशी, लाठी, वनोजा, शेलूबाजार, नागी, तपोवन, तर्हाळा, मसोला येथील शेतकर्यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी राखीव जलसाठय़ासंदर्भात त्वरित निर्णय घेऊन रब्बी हंगामाचा लाभ शेतकर्यांना पुरेपूर मिळावा, याकरिता जिल्हा प्रशासनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यावर्षीच्या अत्यल्प पर्जन्यवृष्टीमुळे मुख्य सोयाबीन पिकांच्या उत्पादनात कमालीची घट आली आहे, त्यामुळे दुबार व तिबार पेरण्याचे पैसे वसूल झाले नाही, याचा परिणाम महत्त्वाच्या दिवाळी सणावरून दिसून आले. गेल्या दोन वर्षांपूर्वी सोनल प्रकल्पात ५६ टक्के जलसाठा असताना हरभरा पिकांसाठी ४ वेळा पाणी देण्यात आले होते. यंदा तर प्रकल्पात ७0 टक्के जलसाठा उपलब्ध आहे. १0 टक्के साठा राखीव ठेवून तर्हाळा दोन वेळापर्यंत ४ पाण्याची व्यवस्था होऊ शकते. राखीव जलसाठय़ाचा निर्णय त्वरित होऊन पाणी सोडण्याची मागणी जोर धरत आहे.