सोयाबीनला ५५00 रुपये प्रतिक्विंटल हमी भाव द्या
By Admin | Updated: November 12, 2014 23:14 IST2014-11-12T23:14:54+5:302014-11-12T23:14:54+5:30
शेतक-यांना चरितार्थ भागविने बनले कठीण: तहसीलदारांना निवेदन.

सोयाबीनला ५५00 रुपये प्रतिक्विंटल हमी भाव द्या
वाशिम: कायम संकटाचा सामना करणार्या वाशिम जिल्हय़ातील शेतकर्यांच्या सोयाबीन या मुख्य पिकाच्या उत्पादनात प्रचंड घट आली आहे. त्यामुळे चरितार्थ भागविण्याचा प्रश्न निर्माण झालेल्या शेतकर्यांच्या अल्प उत्पादीत सोयाबीन िपकाला किमान ५५00 रुपये प्रतिक्विंटल हमी भाव देण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.
यासंदर्भात तहसिलदारांसह जिल्हाधिकार्यांना व कृषी मंत्र्यांना निवेदन पाठविण्या त आले आहे. जिल्हय़ातील सर्व शेतकर्यांवर संकटाची मालिका सुरुच असल्याने शेतकरी मेताकुटीस आला आहे. नुकतीच सोयाबीनची काढणी केलेल्या शे तकर्यांना पिकासाठी एकरी झालेला खर्चही वसुल झाला नसल्याने पुढचे पिक येईपर्यंत चरितार्थ चालवावा कसा असा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे. जिल्हय़ा तील २ लाख ८८ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली. उर्वरीत क्षेत्रावर क पाशी, तुर, उडीद, मुग ज्वारी, बाजरी, मका सुर्यफूल आदी पिकांची पेरणी शे तकर्यांनी केली होती. परंतु खरीपाच्या मोसमात पावसाच्या लहरीपणामुळे शे तकर्यांचे हिरवे स्वप्न पुरते चकना चुर झाले. पावसाचा लहरीपणा सोबतच विविध किडींचा प्रादुर्भाव यामुळे जिल्हयातील शेतकर्यांच्या प्रमुख व नगदी सोयाबीन िपकाच्या उत्पादनात प्रचंड घट झाली. एकरी ५0 किलोपासून ३ क्विंटलपर्यंतच शे तकरी सोयाबीनचे उत्पादन घेवू शकले. एकीकडे पिकासाठी झालेला खर्च व सोयाबीनला ३२00 रुपये प्रतिक्विंटल असलेला भाव लक्षात घेता आधीच उत् पादनात प्रचंड घट आलेल्या शेतकर्यांना झालेला खर्च होणे नाही. त्यामुळे उदरनिर्वाह भागविण्याचा प्रश्न लक्षात घेता शेतकर्यांच्या उत्पादीत सोयाबीनला प्र ितक्विंटल ५५00 रुपये हमी भाव देण्याची मागणी संभाजी ब्रिगेडचे कृष्णा चौधरी, रवि मोरे, विजय खिल्लारी, दिपक भिसडे, नितीन वानखेडे, दिपक इंगोले, भागवत मापारी आदिंनी तहसिलदार तथा इतरांकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे.