नव्या शिधापत्रिकाधारकांना रास्तधान्य द्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 13:32 IST2017-10-24T13:31:30+5:302017-10-24T13:32:55+5:30
मालेगाव : तब्बल वर्षभरापासून नव्याने शिधापत्रिकाधारकांना तसेच नव्याने झालेल्या लाभार्थ्यांना शिधापत्रिकावरुन धान्य वितरण का होत नाही असा खडा सवाल आमदार अमित झनक यांनी तालुका दक्षता समितीच्या सभेत संबधीत यंत्रणेला केला.

नव्या शिधापत्रिकाधारकांना रास्तधान्य द्या !
मालेगाव : तब्बल वर्षभरापासून नव्याने शिधापत्रिकाधारकांना तसेच नव्याने झालेल्या लाभार्थ्यांना शिधापत्रिकावरुन धान्य वितरण का होत नाही असा खडा सवाल आमदार अमित झनक यांनी तालुका दक्षता समितीच्या सभेत संबधीत यंत्रणेला केला.
मालेगाव तालुका दक्षता समितीची सभा आमदार अमीत झनक यांचे अध्यक्षतेखाली तहसीलदार राजेश वझीरे यांचे प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी वर्षभरापासून शिधापत्रिकेत नव्याने नाव नोंदणी केलेल्या तथा नवीन शिधापत्रिका धारकांना धान्य वितरीत का होत नाही असा सवाल आमदार झनक यांनी कला यावेळी राजेश वझीरे यांनी याबाबतची मागणी तातडीने पुरवठा विभागाने नोंदवावी अन्यथा कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले तसेच नगराध्यक्षा मिनाक्षी परमेश्वर सावंत यांनी अंधतथा अंपग आणि शिधापत्रिका धारक हे दुकानापर्यंत येवु शकत नसल्याने त्यांचे धान्य व्दारपाचे करण्याची मागणी केली.अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांची शिधापत्रिका रद्द न करता कायम ठेवावी अशी मागणी पल्लवी मोहन बळी यांनी केली.रणजीत मेडशीकर यांनी दिवाळीचा सण असतांना केरोसीन दिवाळीपुर्वी वितरण करण्याची बांधलकी जोपासला पाहिजे होती, असा मुद्दा मांडला. त्याचप्रमाणे शसकीय धान्य गोदामात सिसीटीव्ही कॅमेरे लावावेत मालेगाव शहराच्या वाढत्या लोकसंख्येला लक्षात घेता स्वस्त धान्य दुकाने वाढवावी प्लेट काटा लावणे, प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेच्या गॅसधारकांची यादी मागवुन सदस्यांना उपलब्ध करुन द्यावे, केरोसीन तथा रास्त धान्य दुकानात तालुका दक्षता समितीचे बोर्ड लावावे यासह विविध ठराव मांडण्यात आलेत. या सभेला अध्यक्षपदी आमदार अमित झनक ,तहसीलदार राजेश वझीरे, निरीक्षण अधिकारी सी.यु. भोसले, नगराध्यक्षा मिनाक्षी सावंत, प्रियाताई पाठक, पल्लवी मोहन बळी, पं.स.सभापती मंगलाताई गवई, रणजीत मेडश्ीकर, रविंद्र कांबळे, बिडीओ एस.पी.थोरात यांची उपस्थिती होती.