विष प्राशन करून मुलीची आत्महत्या
By Admin | Updated: June 6, 2016 02:08 IST2016-06-06T02:08:16+5:302016-06-06T02:08:16+5:30
मंगरूळपीर तालुक्यातील घटना.

विष प्राशन करून मुलीची आत्महत्या
मंगरुळपीर (जि. वाशिम): तालुक्यातील चिखलागड येथील मुलीने विषारी द्रव्य प्राशन केल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना ५ जून रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.
फिर्यादी वैद्यकीय अधिकारी डॉ. एन.पी. इंगोले (रा. मंगरुळपीर) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत असे नमूद केले आहे, की भाग्यश्री जाधव (१७ रा. चिखलागड) या मुलीस तिच्या नातेवाइकाने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणी केली असता, सदर मुलीचा विषारी द्रव्य प्राशन केल्याने मृत्यू झाला होता. या प्रकारच्या अहवालावरून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली.