सुसंस्कार  शिबिरातून मुलींना आत्मरक्षणाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 01:55 PM2018-05-24T13:55:54+5:302018-05-24T13:55:54+5:30

किन्हीराजा: मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा येथे १७ मे पासून बाल सुसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, २७ मे पर्यंत चालणाऱ्या या शिबिरात मुलींना तज्ज्ञ मार्गदर्शक आणि संतांच्या सानिध्यात आत्मरक्षणाचे धडे दिले जात आहेत. 

Girls' self-defense lessons from the sycophancy camp | सुसंस्कार  शिबिरातून मुलींना आत्मरक्षणाचे धडे

सुसंस्कार  शिबिरातून मुलींना आत्मरक्षणाचे धडे

Next
ठळक मुद्देगुरुदेव सेवाश्रम व समस्त ग्रामवासियांच्या विद्यमाने १७ मे पासून बाल सूसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. व्यायाम, योगासने, लाठीकाठी, लेझिम, मनोरंजन खेळ व भजन संगीत आदिंचे शिक्षण दिले जात आहे. हरीभाऊ वेरुळकर गुरुजी संपूर्ण महाराष्ट्रात ६० ते ७० ठिकाणी सूसंस्कार शिबिरांचे आयोजन लोकसहभागातून करीत आहेत.

किन्हीराजा: मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा येथे १७ मे पासून बाल सुसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, २७ मे पर्यंत चालणाऱ्या या शिबिरात मुलींना तज्ज्ञ मार्गदर्शक आणि संतांच्या सानिध्यात आत्मरक्षणाचे धडे दिले जात आहेत. 
किन्हीराजा येथील श्री गुरुदेव सेवाश्रम व समस्त ग्रामवासियांच्या विद्यमाने १७ मे पासून बाल सूसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात सेवाभावी व प्रशिक्षीत शिक्षकांकडून बौद्धिक विषयांतर्गत आदर्श दिनचर्या, धर्मसभा, राष्ट्रीय एकात्मताा, चरित्र संवर्धन, थोर पुरु षाची जीवन चरित्रे, स्वावलंबन, आज्ञापालन, श्रमनिष्ठा, व्यसनमुक्ती, सेवा व शिस्त, स्वदेश प्रेम, नैतिक शिक्षण, निर्भयता, व्यक्तीमत्व विकास, सप्तकलागुणांचा विकास ग्रामगित, श्रीमद भागवत व गितेमधील निवडक ओव्या, आदर्श ग्रामनिर्माण, गोरक्षण, अंधश्रध्दा निर्मुलन, तसेच व्यायाम, योगासने, लाठीकाठी, लेझिम, मनोरंजन खेळ व भजन संगीत आदिंचे शिक्षण दिले जात आहे. त्याशिवाय मुलींना आत्मरक्षणाचे धडे दिले जात आहेत. यामध्ये लाठी काठीसह इतर कसरती शिकविल्या जात आहेत. या शिबिराबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना नारायणराव घुगे म्हणाले की, आजच्या धावपळीच्या जिवनात आई-वडिल, पालकांना आपल्या मुलामुलींवर संस्कार करण्यास वेळ उरलेला नाही. याचा विचार करूनच राष्ट्रसंतांचे अनुयायी हरीभाऊ वेरुळकर गुरुजी संपूर्ण महाराष्ट्रात ६० ते ७० ठिकाणी सूसंस्कार शिबिरांचे आयोजन लोकसहभागातून करीत आहेत.  हा उपक्रम सामाजिक समरसतेचे दर्शन घडविणारा आहे. आजच्या काळात महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार, महिला शोषणाच्या घटना चिंताजनक आहेत. हे टाळण्यासाठी नव तरुणींना स्वसंरक्षण करण्यासाठी या सूसंस्कार शिबिरात प्रशिक्षण दिले जाते, ही बाब अत्यंत चांगली आहे. शिबिर प्रमुख गणेश बोदडे गुरुजी, रविभाऊ गायकवाड, नंदकिशोर वरईकर, ज्ञानेश्वर मापारी, ही तज्ज्ञ शिक्षक मंडळ मुला, मुलींना मार्गदर्शनासह प्रशिक्षणही देत आहेत. यशस्वितेसाठी पांडुरंग खुरसडे, गजानन इंगळे, रविंद्र तायडे, मयूर इंगळे, गोपाल सरोदे, वैभव अंबोलकर, अभय राठोड, दत्ता खुरसडे, अक्षय इंगळे आदि मंडळी परिश्रम घेत आहेत.

Web Title: Girls' self-defense lessons from the sycophancy camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम