खड्डय़ामुळे मातेच्या हातातून पडली मुलगी

By Admin | Updated: September 28, 2015 02:13 IST2015-09-28T02:13:06+5:302015-09-28T02:13:06+5:30

खड्डय़ातून मोटारसायकल उसळल्यानंतर तीन वर्षीय बालिका आईच्या हातातून निसटून रस्त्यावर पडल्याने जखमी; महामार्गावरील घटना.

The girl lying in the hand of the mother due to the pothole | खड्डय़ामुळे मातेच्या हातातून पडली मुलगी

खड्डय़ामुळे मातेच्या हातातून पडली मुलगी

जऊळका रेल्वे (जि. वाशिम): नागपूर ते औरंगाबाद महामार्गावरील काळा माथाजवळ असलेल्या खड्डय़ातून मोटारसायकल उसळल्यानंतर तीन वर्षीय बालिका आईच्या हातातून निसटून रस्त्यावर पडल्याने जखमी झाली. ही घटना २७ सप्टेंबर रोजी ६ वाजताच्या दरम्यान घडली. दशरथ महादेव वानखेडे, त्यांची पत्नी व तीन वर्षाची मुलगी शेलूबाजारवरून डही मालेगाव गावाला जाण्यासाठी निघाले असताना काळा माथाजवळ असलेल्या जीवघेण्या खड्डय़ामध्ये गाडी गेल्याने उसळली. गाडी उसळल्यामुळे मागे बसलेल्या आईच्या हातातील चिमुकली रस्त्यावर पडून जखमी झाली. त्यावेळी प्रवास करीत असलेल्या अन्य वाहनचालकांनी मुलीला उचलले. तिला उपचारासाठी मालेगाव येथे नेण्यात आले. मालेगाव ते शेलूबाजार या रस्त्यावर खड्डय़ांचे साम्राज्य असल्यामुळे अनेक अपघात रोज घडत आहेत. काटेपूर्णाच्या पुलावरही मोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे अपघात मोठय़ा प्रमाणात घडत आहे.

Web Title: The girl lying in the hand of the mother due to the pothole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.