महाविदयालयास नॅक समितीची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 19:59 IST2017-10-04T19:39:00+5:302017-10-04T19:59:53+5:30
कारंजा : दि.बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी अकोला व्दारा संचालीक स्थानिक श्री किसनलाल नथमल गोयनका महाविदयालयात राष्ट्रीय मानक व मुल्याकंन समिती नॅक ने भेट देउन महाविद्यालयातील विविध उपक्रमाची पाहणी करून माहीती जाणून घेतली.

महाविदयालयास नॅक समितीची भेट
ठळक मुद्देकिसनलाल नथमल गोयनका महाविदयालयातविविध उपक्रमाची पाहणी करून माहीती जाणून घेतली
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा : दि.बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी अकोला व्दारा संचालीक स्थानिक श्री किसनलाल नथमल गोयनका महाविदयालयात राष्ट्रीय मानक व मुल्याकंन समिती नॅक ने भेट देउन महाविद्यालयातील विविध उपक्रमाची पाहणी करून माहीती जाणून घेतली.
यावेळी माजी कुलगुरू डॉ.स्मृतीकुमार सरकार, डॉ. एच.राजशेखर यांचा समावेश होता. बी.जी.सोसायटीचे अध्यक्ष डॉ.राजकुमार हेडा, मानद सचिव अॅड मोतीसह मोहता, वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ.रविंद्र जैन, कार्यकारणी सदस्य महाविद्यालयीन विकास समिती सदस्यासोबत शैक्षणिक व भौतिक विकासाच्या संदर्भात चर्चा केली.